उद्धव ठाकरेंच्या राज्यात शिवसैनिक शिरजोर? भरचौकात टक्कल करून मारहाण

उद्धव ठाकरेंच्या राज्यात शिवसैनिक शिरजोर? भरचौकात टक्कल करून मारहाण

हिरामणी तिवारी हे बजरंग दल या संस्थेशी संबंधित आहे. तसेच ते विश्व हिंदू परिषदेसाठी काम करत असल्याची माहिती मिळाली आहे.

  • Share this:

मुंबई,23 डिसेंबर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हिरामणी तिवारी असे या व्यक्तीचे नाव असून शिवसैनिकांनी भर चौकात त्याचे टक्कल करून बेदम मारहाण केली. मारहाणीमुळे या व्यक्तीच्या कानाच्या पडद्याला दुखापत झाली आहे. शिवसैनिकांवर कारवाई व्हावी, अशी मागणी व्यक्तीने केली. दरम्यान, हिरामणी तिवारी हे बजरंग दल या संस्थेशी संबंधित आहे. तसेच ते विश्व हिंदू परिषदेसाठी काम करत असल्याची माहिती मिळाली आहे.

उद्धव ठाकरेंच्या राज्यात शिवसैनिक शिरजोर?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात फेसबुकवर पोस्ट टाकली म्हणून मुंबईच्या वडाळ्यातील हिरामणी तिवारी यांना शिवसैनिकांनी बेदम मारहाण केली. मात्र, तेवढ्यावर शिवसैनिक थांबले नाहीत तर त्यांनी हिरामणीचे चक्क मुंडन केले आहे. दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीची तुलना उद्धव ठाकरे यांनी जालियनवाला बागच्या नरसंहाराशी केली होती. त्यावर हिरामणी तिवारी यांनी उद्धव ठाकरेंविरोधात फेसबूक पोस्ट टाकली होती. त्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी हिरामणी यांनी ही शिक्षा दिली.

एकीकडे उद्धव ठाकरेंच्या हाती राज्याची सूत्रे असताना शिवसैनिकांनी कायदा हाती घेतला आहे. विशेष म्हणजे गृह मंत्रालयाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. त्यामुळे या मारहाण आणि मुंडन प्रकरणी संबंधीत शिवसैनिकांवर कारवाई करण्याचे धाडस पोसिस दाखवणार का? हाच खरा प्रश्न आहे.

First published: December 23, 2019, 4:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading