Home /News /mumbai /

OBC Reservation: ओबीसी आरक्षणासाठी भाजप मैदानात; उद्या चक्का जाम आंदोलन

OBC Reservation: ओबीसी आरक्षणासाठी भाजप मैदानात; उद्या चक्का जाम आंदोलन

OBC Poliitcal Reservation: ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर भारतीय जनता पक्षाकडून उद्या चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.

    मुंबई, 25 जून: ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा (OBC Political Reservation) मुद्दा तापलेला असताना आता भाजपकडून (BJP) रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात येणार आहे. शनिवार (26 जून 2021) रोजी सकाळी भजापच्या वतीने चक्का जाम आंदोलन (Chakka Jam Andolan for Reservation) करण्यात येणार आहे. मुंबईत काल झालेल्या भाजपच्या बैठकीतही देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाबाबत भाष्य केलं होतं. राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणापुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्यामुळे राज्यातील ओबीसी समाजाचे मोठे राजकिय नुकसान होणार आहे. तसेच भविष्यात राजकिय आरक्षणा प्रमाणे शैक्षणिक आणि नोकरी मधील आरक्षण देखील रद्द होण्याची शक्यता आहे असंही भाजपने म्हटलं आहे. हे चक्का जाम आंदोलन भाजपकडून राज्यभरात ठिकठिकाणी करण्यात येणार आहे. वसई विरार जिल्ह्यात ओबीसी समाज मोठया प्रमाणात वसलेला आहे म्हणून आमदार प्रसाद लाड महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, आमदार, वसई विरार जिल्हा प्रभारी ह्यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे. ओबीसी समाजाच्या न्याय आणि हक्कासाठी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात चक्का जाम आंदोलन शनिवार दिनांक 26 जून रोजी सकाळी 10 वाजता पंचवटी हॉटेल, अंबाडी रोड, वसई येथे होणार आहे. 'ईडी, सीबीआयद्वारे सूड उगवण्याचा नवा पॅटर्न', अनिल देशमुखांच्या चौकशीवर शरद पवारांची प्रतिक्रिया तरी राजकीय मतभेद बाजूला ठेऊन ओबीसी समाजाच्या हितासाठी विविध ओबीसी समाजाचे नेतृत्व करण्याऱ्या ओबीसी नेत्यांनी आपल्या समाजातील लोकप्रतिनिधी, समाज बांधवांसहीत तसेच ओबीसी प्रवर्गातुन निवडुन आलेल्या जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व विविध संस्थेचे प्रतिनिधींनी आंदोलनात सहभागी व्हावे असेही सांगण्यात आले आहे. चार महिन्यात आरक्षण देऊ - फडणवीस काल झालेल्या भाजपच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस म्हणाले, जाणीवपूर्वक ओबीसींना राजकीय आरक्षणच द्यायचं नाहीये. उठलं तर केंद्राकडे बोट दाखवतात. अरे नसेल तुमच्यात हिंमत तर आम्हाला सांगा, आम्ही जर चार महिन्यात... हो आमचं राज्य असंत... चार महिन्यात ओबीसींचा एम्पिरिकल डेटा तयार करुन जर ओबीसींचं आरक्षण पूर्ववत आणलं नाही तर पदावर देखील राहणार नाही. या सरकारला आम्ही झोपू देणार नाही भाजप 26 तारखेचं आंदोलन करुन शांत बसणार नाही. ओबीसींचं राजकीय आरक्षण जोपर्यंत परत येणार नाही तोपर्यंत या सरकारला आम्ही झोपू देणार नाही. आता हा संघर्ष अटळ आहे. तुम्हाला नसेल जमत तर मदत मागा आम्ही मदत करायला तयार आहोत. ओबीसींसाठी संघर्ष करु. पण जर ओबीसींना फसवाल तर भाजप शांत बसणार नाही असंही देवेंद्र फडवीस म्हणाले.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: BJP, Maharashtra

    पुढील बातम्या