मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

नाना पटोलेंची तोफ बारामतीत धडाडणार; काय बोलणार?

नाना पटोलेंची तोफ बारामतीत धडाडणार; काय बोलणार?

पुणे जिल्ह्यातील बारामती येथे ओबीसींचा महामेळावा होणार आहे. या मेळाव्यात नाना पटोले सहभागी होणार आहे.

पुणे जिल्ह्यातील बारामती येथे ओबीसींचा महामेळावा होणार आहे. या मेळाव्यात नाना पटोले सहभागी होणार आहे.

पुणे जिल्ह्यातील बारामती येथे ओबीसींचा महामेळावा होणार आहे. या मेळाव्यात नाना पटोले सहभागी होणार आहे.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 15 जुलै : ओबीसींचे राजकीय आरक्षण आणि आपल्या इतर मागण्यांच्या संदर्भात पुणे जिल्ह्यातील बारामती (Baramati Pune) येथे ओबीसी समाजाचा एक महामेळावा (OBC Maha Melava) आयोजित करण्यात आला आहे. येत्या 29 जुलै रोजी हा महामेळावा होणार असून त्या मेळाव्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यासाठी छगन भुजबळ, महादेव जानकर, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बारामतीत ओबीसींचा हा महामेळावा होत आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी नाना पटोलेंवर निशाणा साधला होता आणि त्यानंतर आता नाना पटोले हे बारामतीत दाखल होणार आहेत. हा ओबीसींचा महामेळावा असला तरी या मेळाव्यात नाना पटोले काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

"आमदारांवर विश्वास नाही त्यामुळे निवडणूक पद्धत बदलीचा विषय आला"

नाना पटोले काय म्हणाले?

बारामती येथेल महामेळाव्याच्या संदर्भात नाना पटोले म्हणाले, बारामती केंद्र शासित भाग नाही, केंद्र स्थानी गाव, ओबीसी मेळावा तिथ आयोजक केला म्हणून तिथे जात आहे त्यावरून वेगळा अर्थ काढू नये. तर या महामेळाव्याच्या संदर्भात बाळासाहेब थोरात यांनी म्हटले, बारामती येथे ओबीसी महामेळावा आहे पण तो केंद्र सरकारच्या विरोधात आहे. बारामती आहे म्हणून वेगळा अर्थ काढायला नको.

29 जुलै रोजीच्या या मेळाव्याला मी स्वत: उपस्थित राहणार आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात हा मोठा मेळावा होणार आहे. संविधानात राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक अधिकार ओबीसी समाजाला दिले आहेत ते डावलण्याचे काम होत आहे ते आम्ही सहन करणार नाही. म्हणून ज्या पद्धतीने एक भव्य मेळावा बारामतीत आयोजित करण्यात आला आहे तेथे मी उपस्थित राहणार आहे.

First published:

Tags: Baramati, Nana Patole