मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /भयंकर! चुकीचं इंजेक्शन दिल्याने पेशंटचा मृत्यू, नर्सला अटक

भयंकर! चुकीचं इंजेक्शन दिल्याने पेशंटचा मृत्यू, नर्सला अटक

ताप आल्यामुळे औषध घेण्यासाठी रुग्णालयात आलेल्या महिलेला नर्सनं चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे.

ताप आल्यामुळे औषध घेण्यासाठी रुग्णालयात आलेल्या महिलेला नर्सनं चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे.

ताप आल्यामुळे औषध घेण्यासाठी रुग्णालयात आलेल्या महिलेला नर्सनं चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे.

मुंबई, 30 डिसेंबर: रुग्णालयात (Hospital) आलेल्या महिलेला (Woman patient) नर्सनं (Nurse) चुकीचं इंजेक्शन (Wrong injection) दिल्यामुळे रुग्ण महिलेचा मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. या प्रकरणी इंजेक्शन देणाऱ्या नर्सला पोलिसांनी अटक (Nurse arrested) केली आहे. एका चुकीच्या इंजेक्शनमुळेच या रुग्णाचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक चौकशीत दिसून येत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

अशी घडली घटना

मुंबईतील शिवाजी नगर भागात असणाऱ्या मन्नत हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला. शबाना अन्सारी असं मृत महिलेचं नाव आहे. ‘फ्री प्रेस जर्नल’ने दिलेल्या माहितीनुसार शबानाला ताप आल्यामुळे त्या उपचार घेण्यासाठी मन्नत हॉस्पिटलध्ये आल्या होत्या. त्यावेळी तिथं असणाऱ्या नर्सनं त्यांना काही औषधं आणि इंजेक्शन दिलं. मात्र इंजेक्शन दिलेल्या जागी त्यांना दोन दिवसांनी सूज येत असल्याचं जाणवलं. त्यामुळे त्यावर उपचार घेण्यासाठी त्या पुन्हा हॉस्पिटलमध्ये आल्या. त्यावेळी त्यांच्यावर काही शस्त्रक्रिया करून त्यांना सोडण्यात आलं. त्यानंतर मात्र पुन्हा त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना प्रचंड त्रास होऊ लागला. तब्येत पूर्णतः ढासळल्यामुळे त्यांना कुटुंबीयांनी KEM रुग्णालयात दाखल केलं. मात्र तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

कुटुंबीयांची पोलिसांत तक्रार

शबानाच्या कुटुंबीयांनी याबाबत शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी मेडिकल रिपोर्ट तपासणीसाठी जेजे हॉस्पिटलला पाठवून दिला आहे.

हे वाचा- चोरट्यांनी दिवसाढवळ्या लुटले लाखो, पोलीस बसले हद्दीवरून भांडत; नागरिकांचा संताप

हॉस्पिटलच्या मालकाविरोधातही गुन्हा

इंजेक्शन देणाऱ्या नर्सप्रमाणेच त्या हॉस्पिटलचे मालक रेहान खान यांच्याविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र आपण ऑपरेशनमध्ये किंवा उपचार देण्याच्या प्रक्रियेत सहभागी नसल्यामुळे आपलं नाव वगळण्यात यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. मात्र साध्या तापाच्या रुग्णाचा एका इंजेक्शनमुळे थेट मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

First published:
top videos