Home /News /mumbai /

उद्धव ठाकरेंची साथ सोडणाऱ्या आमदारांची संख्या वाढली? आणखी सहा आमदार संपर्कात नाही

उद्धव ठाकरेंची साथ सोडणाऱ्या आमदारांची संख्या वाढली? आणखी सहा आमदार संपर्कात नाही

सध्या गुवाहाटीमध्ये जवळपास 45 आमदार उपस्थित आहेत. त्यात आता आणखी आमदार संपर्कात नसल्याने शिवसेनेची चिंता वाढली आहे.

    मुंबई, 23 जून : बंडखोर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) याच्या गटात सामील होणाऱ्या शिवसेना आमदार नेत्यांची संख्या वाढताना दिसत आहेत. शिवसेनेचे आणखी सहा आमदारांसोबत शिवसेनेचा संपर्क होत नाही. सध्या गुवाहाटीमध्ये (Guwahati) जवळपास 45 आमदार उपस्थित आहेत. त्यात आता आणखी आमदार संपर्कात नसल्याने शिवसेनेची चिंता वाढली आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे मुंबईतील दोन आमदार नॉटरिचेबल आहेत. सध्या मंत्री दादा भुसे, संजय राठोड, आमदार मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, दीपक केसरकर आणि दिलीप लांडे यांच्याशी संपर्क होत नाही. कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या नेत्यांनी बंडाचं निशाण उगारल्याने नेमकी नाराजी काय आहे. एकप्रकारे पक्ष नेतृत्वावर आमदारांची नाराजी असल्याची चर्चाही आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. सध्या सर्व बंडखोर सर्व आमदारांची राहण्याची व्यवस्था ही गुवाहाटीमधील 'रेडीसन ब्लू' हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. या हॉटेलमध्ये शिवसेनेचे 45 पेक्षा जास्त आमदार आहेत. यामध्ये गुलाबराव पाटील हे देखील आहेत. गुलाबराव हे शिंदे यांच्या गोटात गेल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगला सोडला
    दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी त्यांचं शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला सोडला. याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांना भावनिक आवाहन केलं होतं. यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवहानानंतर आमदारांच मनपरिवर्तन होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जात आहे. सुप्रीम कोर्टात याचिका महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय कोंडीच्या (Maharashtra Political Crises) पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या जया ठाकूर (Jaya Thakur) यांनी सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका दाखल केली आहे. राजीनामा दिलेल्या किंवा विधानसभेतून अपात्र ठरलेल्या आमदारांना निवडणूक लढवण्यास पाच वर्षांची बंदी घालावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेले राजकीय संकट पाहता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणीही त्यांनी केली. पक्षांतरविरोधी कायद्याला बगल देऊन राजकीय पक्ष सरकार कसे पाडत आहेत, असे या याचिकेत सांगण्यात आले. विधानसभेचा राजीनामा देणाऱ्या आमदारांना पोटनिवडणूक लढवण्यासाठी तिकीट मिळते, तसेच ते नव्या सरकारमध्ये मंत्रीही होतात.
    First published:

    Tags: BJP, Eknath Shinde, Shivsena, Uddhav thackarey

    पुढील बातम्या