मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक, धक्कादायक आकडेवारी समोर!

राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक, धक्कादायक आकडेवारी समोर!

Coronavirus: बंगळुरूतील एकाच शाळेतील 60 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग (प्रातिनिधिक फोटो)

Coronavirus: बंगळुरूतील एकाच शाळेतील 60 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग (प्रातिनिधिक फोटो)

मागील 24 तासात कोरोनामुळे 216 जणांचा मृत्यू झाला आहे. तर नवी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5 हजारांच्या पुढे गेली आहे.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 25 ऑगस्ट : राज्यात कोरोनाची लाट (maharashtra corona cases) ओसरल्यामुळे सर्व बाजारपेठा, लोकल सेवा सुरू झाली आहे. रस्ते पुन्हा एकदा गर्दीने फुलून गेली आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून आटोक्यात असलेली कोरोनाबाधित ( corona patients) रुग्णांची संख्या आज अचानक वाढली आहे. मागील 24 तासात कोरोनामुळे 216 जणांचा मृत्यू (corona death cases) झाला आहे. तर नवी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5 हजारांच्या पुढे गेली आहे.

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून गेल्या 24 तासांतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रसिद्ध करण्यात आली आहे. आज राज्यात तब्बल 5031 नवे रुग्ण आढळून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून ही रुग्ण संख्या 4 हजाराच्या घरात होती. पण, आता अचानक त्यात वाढ झाली आहे. तर 216 जणांचा कोरोनामुळे मृ्त्यू झाला आहे. मृत रुग्णांची संख्या वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. सोमवारी ही संख्या १०५ इतकी होती. आज दुपट्टीने वाढ झाली आहे. राज्यात मृत्यूदर हा २.१२ टक्के इतका आहे.

Making of Real Pilot! लेकीला खुणावत होतं आकाश, वडिलांनी विकली जमीन

रुग्णांची संख्या वाढली असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. आज 4,380 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९७.०७ टक्के इतके आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णाची संख्या पुन्हा 50 हजाराच्यावर पोहोचली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून कोरोना नियमाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

डेल्टा विषाणू वाढता वाढे!

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी  कोविड विषाणू जनुकीय सूत्र निर्धारण करणाऱ्याCoronavirus genome sequencing) मुंबईतील पहिल्या चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर झाले आहेत. त्यातून धक्कादायक माहिती पुढे आली. कोविड चाचणीच्या 188 नमुन्यांमध्ये सर्वाधिक 128 रुग्ण डेल्टा विषाणूचे आहेत. अल्फा 2, केपा 24, तर इतर सर्वसाधारण प्रकाराचे विषाणू आढळले असल्याचं महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आलं.

IND vs ENG : विराट कोहलीची घोडचूक टीम इंडियाला पडली महागात, सीरिजही धोक्यात!

कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याचे आकडे सांगत असले तरी साथ संपलेली नाही. कोविड प्रतिबंधात्मक निर्देशांचं नागरिकांनी कठोर पालन करावं, असं आवाहन सरकारने केलं आहे.

First published:

Tags: Corona, Covid cases