मनोधैर्य योजनेत वाढ, 3 लाखांऐवजी आता मिळणार 10 लाखांची मदत

मनोधैर्य योजनेत वाढ, 3 लाखांऐवजी आता मिळणार 10 लाखांची मदत

अ‍ॅसिड हल्ल्यामुळे महिला किंवा बालकास मतिमंदत्व, अपंगत्व आल्यास, सामूहिक बलात्कारांच्या प्रकरणात गंभीर इजा झाल्यास किंवा अ‍ॅसिड हल्ल्यात चेहरा विद्रुप झाल्यास १० लाखांचे अर्थसहाय्य मिळेल.

  • Share this:

19 जुलै : बलात्कार, अ‍ॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला व लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या बालकांचे पुनर्वसन व त्यांना अर्थसहाय्य करण्यासाठीच्या मनोधैर्य योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. आता या योजनेत कमाल ३ लाख रुपयांऐवजी १० लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने  हा निर्णय घेतला.

अ‍ॅसिड हल्ल्यामुळे महिला किंवा बालकास मतिमंदत्व, अपंगत्व आल्यास, सामूहिक बलात्कारांच्या प्रकरणात गंभीर इजा झाल्यास किंवा अ‍ॅसिड हल्ल्यात चेहरा विद्रुप झाल्यास १० लाखांचे अर्थसहाय्य मिळेल. ७५ टक्के रक्कम १० वर्षांसाठी पीडितांच्या नावाने बँकेत मुदत ठेव म्हणून तर २५ टक्के रकमेचा धनादेश तात्काळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

३१ डिसेंबर २००९ पासूनच्या पात्र प्रकरणांना पूर्वलक्षी प्रभावाने ही योजना लागू करण्यास  मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

 

First published: July 19, 2017, 10:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading