S M L

आता, राहुल गांधी देशाचं नेतृत्व करण्यास सक्षम,संजय राऊतांचं 'सर्टीफिकेट'

"2014 च्या निवडणुकीत मोदी लाट होती. पण आता ती ओसरली आहे. जीएसटीमुळे लोकं वैतागले असून गुजरातमध्ये रस्त्यावर उतरले आहे"

Sachin Salve | Updated On: Oct 26, 2017 10:05 PM IST

आता, राहुल गांधी देशाचं नेतृत्व करण्यास सक्षम,संजय राऊतांचं 'सर्टीफिकेट'

26 आॅक्टोबर : मोदी लाट ओसरली असून आता काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी देशाचं नेतृत्व करण्यास सक्षम आहे असं प्रमाणपत्रचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देऊ केलंय.

भाजप सरकारने नोटबंदीनंतर जीएसटी लागू केला. याचा जनतेमध्ये प्रचंड रोष आहे आणि हेच भाजपला निवडणुकीत आव्हान ठरणार आहे असंही संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय.

सोशल मीडियावर एका गटाचा वापर राहुल गांधी यांची खिल्ली उडवण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे राहुल गांधी देशाचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम झाले आहे. त्यांना पप्पू म्हणून हिणवणं चुकीचं आहे असंही राऊत म्हणाले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला विनोद तावडेंही हजर होते.देशात सर्वात मोठी शक्ती ही जनता आहे, मतदार आहे. ते कुणालाही पप्पू करू शकतात असा टोलाही राऊतांनी भाजपला लगावला.

2014 च्या निवडणुकीत मोदी लाट होती. पण आता ती ओसरली आहे. जीएसटीमुळे लोकं वैतागले असून गुजरातमध्ये रस्त्यावर उतरले आहे. त्यामुळे भाजपला निवडणुकीत याचा सामना करावा लागणार आहे असं राऊत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 26, 2017 10:00 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close