Home /News /mumbai /

'...नाहीतर मी निघून जाईन', मुख्यमंत्री शिंदेंच्या तुफान टोलेबाजीने सभागृहात हास्यकल्लोळ

'...नाहीतर मी निघून जाईन', मुख्यमंत्री शिंदेंच्या तुफान टोलेबाजीने सभागृहात हास्यकल्लोळ

 आता आम्ही 200 माणसं निवडून आणून दाखवू हे सभागृहामध्ये आश्वासन देतो.आमच्याकडे असलेली 50 माणसं अजिबात पडू देणार नाही. जर

आता आम्ही 200 माणसं निवडून आणून दाखवू हे सभागृहामध्ये आश्वासन देतो.आमच्याकडे असलेली 50 माणसं अजिबात पडू देणार नाही. जर

आता आम्ही 200 माणसं निवडून आणून दाखवू हे सभागृहामध्ये आश्वासन देतो.आमच्याकडे असलेली 50 माणसं अजिबात पडू देणार नाही. जर

    मुंबई, 04 जुलै : 'आता आम्ही 200 माणसं निवडून आणून दाखवू हे सभागृहामध्ये आश्वासन देतो.आमच्याकडे असलेली 50 माणसं अजिबात पडू देणार नाही. जर निवडून आली नाही तर शेती करायला गावाला निघून जाईन' असं  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm ekanth shinde speech) म्हणताच सभागृहामध्ये एकच हश्शा पिकली. शिंदे आणि फडणवीस सरकारने बहुमत चाचणी जिंकली. त्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यावर झालेले आरोप आणि टिकेला सडेतोड उत्तर दिले. यावेळी शिंदे यांनी मनसोक्तपणे भाषण केलं, सभागृहाने शिंदे यांचं भाषण अक्षरश: डोक्यावर घेतलं. ' फडणवीस यांनी त्या दिवशी पत्रकार परिषद घेतली. मी बाजूला बसलेले होतो. फडणवीस आणि मला सगळं माहिती होतं. त्यांनी सांगितलं एकच शपथविधी होणार होता. फडणवीस यांना सगळं काही माहिती होतं. त्यांचे 115 आणि आमचे 50 असे 165 झाले होते. जे शिवसेनेतून गेले होते. त्यावेळी शिवसेनेतून जी लोकं गेली होती ती दुसऱ्या पक्षात गेली होती, त्यामुळे ती पडली होती. आता आम्ही 200 माणसं निवडून आणून दाखवू हे सभागृहामध्ये आश्वासन देतो.आमच्याकडे असलेली 50 माणसं अजिबात पडू देणार नाही. जर निवडून आली नाहीतर...असं म्हणत शिंदे यांनी हात वर केले, त्यामुळे सभागृहात एकच हश्शा पिकली आणि लगेच, 'शेती करायला गावाला निघून जाईन' असं शिंदेंनी वाक्य पूर्ण केलं आणि पुन्हा सभागृहात हास्यकल्लोळ उडाला. 'विधान परिषद निवडणूक संपल्यानंतर आम्ही मुंबईतून निघालो होतो. राज्याच्या सीमेच्या बाहेर होतो, त्यावेळी टॉवर लोकशन होते, आयजीला सांगून नाकाबंदी केली. मीही बरीच वर्ष काम केली. मलाही माहिती आहे, नाकाबंदीमधून कसं निघायचं आहे ते. त्यावेळी अजितदादांनी विचारलं सगळं काही सांगा...,तुम्ही आता माझ्याकडून सगळं काही काढून घेऊ नका, खासगीमध्ये सांगतो सगळं, मी जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही निघून जायचे, असं म्हणताच पुन्हा सभागृहात एकच हश्शा पिकली. 'राज्यसभेला आम्ही पूर्ण फिल्डिंग लावली होती. 42 आमदार घेऊ असं काँग्रेसने ठरवली होती आणि राष्ट्रवादीने एक मत घेतलं, 43 मतं झाली. पण साला आमचा एक माणूस पडला. आम्ही मत मोजली तर काही कळायला मार्ग नाही. पडला तो वेगळा पडला होता, पण दुसरा माणूस पडायला हवा होता. पण मी म्हणालो, दोन्ही खासदार निवडून येण्याचे ठरले होते तसं गणित होतं. आमचे दोन्ही निवडून आले पाहिजे पण गडबड झाली. विधान परिषदेची निवडणुकीतून मला बाहेर काढलं होतं. संजय पवार यांना 3 मत जास्त आणली होती, असा खुलासाही शिंदेंनी केला. अजित पवार हे मंत्रालयात सकाळी सहा वाजताच बैठका घ्यायचे. ते माझ्या खात्याच्या सुद्धा बैठका घ्यायचे. पण ते काम करायचे त्यामुळे मी काही बोललो नाही. त्यांनी 800 कोटी घेतले तरी काही बोललो नाही. पण, अजितदादांनी आणि माझी चांगली अंडरस्टँडिंग होती. त्यांनी एक नोटिंग केलं होतं. त्यानंतर त्यांनी पॅरललं नगरविकास खात्याचा हेड का केला. त्यानंतर मी आक्षेप घेतला. त्यानंतर मी लगेच माघार घेतली. मी कद्रु नाही. काम करणारी माणसं मला आवडतात. माझ्या खात्यात सगळे हस्तक्षेप करायचे. पण मी कधीही काही बोललो नाही. मी लहान होतो, वरिष्ठ मंत्री मला कधीही काढू शकत होते, असा टोलाही शिंदेंनी अजितदादांना लगावला.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या