Home /News /mumbai /

BREAKING : आता मंडपात बाप्पाच्या मुखदर्शनाला मनाई, राज्य सरकारकडून नवीन नियम

BREAKING : आता मंडपात बाप्पाच्या मुखदर्शनाला मनाई, राज्य सरकारकडून नवीन नियम

ganpati festival 2021: आता मंडळात जाऊन गणेश मूर्तींचे दर्शन घेता येणार नाही. त्याऐवजी ऑनलाईन दर्शन घेता येईल अशी व्यवस्था गणेश मंडळांना करून द्यायची आहे.

ganpati festival 2021: आता मंडळात जाऊन गणेश मूर्तींचे दर्शन घेता येणार नाही. त्याऐवजी ऑनलाईन दर्शन घेता येईल अशी व्यवस्था गणेश मंडळांना करून द्यायची आहे.

ganpati festival 2021: आता मंडळात जाऊन गणेश मूर्तींचे दर्शन घेता येणार नाही. त्याऐवजी ऑनलाईन दर्शन घेता येईल अशी व्यवस्था गणेश मंडळांना करून द्यायची आहे.

    मुंबई, 08 सप्टेंबर : गणेशभक्तांना आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या (ganpati festival 2021) आगमनाचे वेध लागले आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चाहूल लागली आहे. त्यामुळे राज्य सरकारने खबरदारीने पाऊलं टाकण्यास सुरुवात केली आहे. गणेशोत्सवाला आधीच नियम घालून दिले आहे. पण, आता सार्वजनिक गणेश मंडपात बाप्पाचं दर्शन घेण्यास भक्तांना मनाई करण्यात आली आहे. (Ganpati festival rules in Maharashtra) राज्य सरकारकडून गणेश भक्तांसाठी नवीन नियम जारी करण्यात आला आहे. त्यानुसार आता मंडळात जाऊन गणेश मूर्तींचे दर्शन घेता येणार नाही. त्याऐवजी ऑनलाईन दर्शन घेता येईल अशी व्यवस्था गणेश मंडळांना करून द्यायची आहे.  राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने सरकारने हा नवा नियम लागू केला आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नियमावली प्रसिद्ध केली आहे.  'यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा' असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे. गृहविभागाकडून गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. यामध्ये मागील वर्षीप्रमाणे यंदाही सारखेच नियम लागू केले आहे. गणेशोत्सवासाठी अशी आहे नियमावली 1) गणेशोत्सवाबाबत परवानगी घेणे अपेक्षित,  शक्यतो मंडप परिसरात होणारी गर्दी टाळावी. कोरोना संसर्ग पाहून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा. नागरिक देतील ती वर्गणी स्विकारावी, सांस्कृतिक उपक्रमाऐवजी आरोग्य कार्यक्रम राबवावेत 2) आरती, भजन, किर्तन या दरम्यान होणारी गर्दी टाळावी. गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी.         3) श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळासाठी 4 फूट आणि घरगुती गणपतीसाठी 2 फुटांच्या मर्यादेत असावी. 4) यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू किंवा संगमरवर अशा मूर्तीचं पूजन करावं. मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचं विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावं. विसर्जन घरी करणं शक्य नसल्यास जवळच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करावं. 5) गणेशोत्सवात देणगी अथवा वर्गणी स्वईच्छेने कोणी देत असेल तरच त्याचा स्वीकार करावा. तसेच गणेशोत्सवात जाहिरातींमुळे नागरिकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. त्याचबरोबर इतर जाहिरातींपेक्षा आरोग्यविषयक जाहिरातींना प्राधान्य देण्यात यावं 6) विविध सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी रक्तदान शिबिरासारखे आरोग्यपूरक उपक्रम राबवण्यावर भर दिलं जावं. तसेच यामाध्यामतून डेंग्यू, मलेरिया, कोरोना सारख्या आजारांची नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी. 7. राज्य सरकारकडून वेळोवेळी लागू करण्यात आलेले Level of Restrictions for Breaking the Chain चे नियम कायम राहतील. गणेशोत्सवा दरम्यान यामध्ये कोणतीही मोकळीक दिली जाणार नाही. 8. त्याचबरोबर आरती, भजन, किर्तन असा धार्मिक कार्यक्रमांत गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियम आणि तरतूदींचं काटेकोर पालन करण्यात यावं. 9. श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. 10. गणपती मंडपांमध्ये निर्जतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शरिरीक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम मास्क, सॅनीटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. 11 श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले व वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनास्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळींतील/ इमारतीतील सर्व घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रित रित्या काढण्यात येऊ नये. 12 महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने गणेशमूर्तीच्या विसर्जनाकरता कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या