Home /News /mumbai /

आता सुपर मार्केटमधून खुशाल घ्या Wine, असे आहे सरकारचे नियम

आता सुपर मार्केटमधून खुशाल घ्या Wine, असे आहे सरकारचे नियम

ज्या वाईनरी वाईन तयार करतात व त्याबाबत विपणन करण्यास असमर्थ आहेत, अशा वाईनरींनी उत्पादित केलेली वाईन थेट सुपर मार्केटमध्ये किंवा...

    मुंबई, 27 जानेवारी : राज्य सरकारने (mva government) आता सुपर मार्केट (Super Market) , वॉक इन स्टोअरमध्ये वाईन (wine) विक्रीला परवानगी देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या निर्णयावर भाजपने आक्षेप घेतला आहे. पण, सुपर मार्केट आणि दुकानदारांना हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे. सुपर शॉपीमध्ये वाईन उपल्बध करुन देण्याबाबतचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. राज्याचा महसूल वाढविण्याचा दृष्टीकोनातून हा निर्णय घेतला गेल्याची चर्चा आहे. कोरोना संकटामुळे राज्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे या संकट काळात राज्याचा महसूल वाढावा या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. असा आहे सरकारचा निर्णय? राज्याचे वाईन धोरण प्रामुख्याने द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना फायदा व्हावा, तसेच, वाईन उद्योगास चालना मिळावी या हेतुने राबविण्यात येत आहे. वाईन उद्योगास चालना मिळण्यासाठी पर्यायाने शेतकऱ्यास त्याच्या मालास योग्य किंमत मिळण्याच्या दृष्टीने वाईन उद्योगाची वाढ तसेच, वाईनचे परिणामकारक विपणन (Marketing) होणे आवश्यक आहे. राज्यात सध्या फळे, फुले, केळी व मधापासून वाईन उत्पादित करण्यात येते. ज्या वाईनरी वाईन तयार करतात व त्याबाबत विपणन करण्यास असमर्थ आहेत, अशा वाईनरींनी उत्पादित केलेली वाईन थेट सुपर मार्केटमध्ये किंवा वॉक इन स्टोअरमध्ये शेल्फ-इन-शॉप या पद्धतीने विक्री करण्याची सुविधा उपलब्ध झाल्यास त्याचा फायदा छोट्या वाईनरी घटकांना व पर्यायाने राज्यातील शेतकऱ्यांना मिळू शकेल. (Air India 69 वर्षांनंतर अधिकृतपणे Tata Group कडे, पुढील प्लानिंग कसं असणार?) सध्या सुपर मार्केटशी संलग्न बीअर व वाईन विक्रीचा (नमूना एफएल/बीआर-II अनुज्ञप्ती ) परवाना देण्यात येतो. आता वाईन विक्रीसाठी पूरक म्हणून सुपर मार्केट किंवा वॉक-इन-स्टोअर मध्ये शेल्फ-इन-शॉप ची संकल्पना राबविण्यात येणार आहे. यासाठी सुपर मार्केटमध्ये किंवा वॉक इन स्टोअरमध्ये (स्वतः स्वयंसेवेने खरेदी करण्याची सुविधा असलेले) कुलूपबंद करता येईल अशा कपाटामधून नमूना एफएल-एक्ससी परवानाधारकास, सीलबंद बाटलीमध्ये वाईनची विक्री करण्याकरिता नमूना ई-4 परवाना  मंजूर करण्यात येणार आहे. यासाठी किमान 100 चौ.मी क्षेत्रफळ असणाऱ्या आणि महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 च्या कलम 6 अन्वये नोंदणीकृत असलेलेच सुपर मार्केट किंवा वॉक इन स्टोअर पात्र ठरणार आहेत. या ठिकाणी 2.25 घन मीटर इतके कमाल आकारमानाचे एकच कुलूपबंद कपाट ठेवता येणार आहे. (बीडमध्ये राष्ट्रवादीचा नगरसेवक निघाला 'पुष्पा', पोलिसांनी केला गुन्हा दाखल) या निर्णयानुसार वाईन विक्री करणाऱ्या सुपर मार्केट आणि स्टोअर्सना देखील शैक्षणिक व धार्मिक स्थळांपासूनच्या अंतराचे निर्बंध लागू राहतील. नमूना ई-4 अनुज्ञप्तीचे 5 हजार इतके वार्षिक अनुज्ञप्ती शुल्क निश्चित करण्यात आले आहे. मात्र,  दारुबंदी लागू असलेल्या जिल्ह्यांमध्ये असे परवाने दिले जाणार नाहीत.

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या