सुप्रीम कोर्टाने ध्वनी प्रदूषणाबाबतची याचिका न्या.अभय ओक यांच्याकडून काढली

सुप्रीम कोर्टानं तसा निर्णय दिलाय. न्या. डी. वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती अजय खानविलकर यांच्या खंडपीठानं आज हा निर्णय दिला.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Oct 6, 2017 07:34 PM IST

सुप्रीम कोर्टाने ध्वनी प्रदूषणाबाबतची याचिका न्या.अभय ओक यांच्याकडून काढली

मुंबई, 06 आॅक्टोबर : मुंबई हायकोर्टात सुरू असलेली ध्वनी प्रदूषणाबाबतची याचिका न्यायमूर्ती अभय ओक यांच्याकडून काढून घेण्यात आलीय. सुप्रीम कोर्टानं तसा निर्णय दिलाय. न्या. डी. वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती अजय खानविलकर यांच्या खंडपीठानं आज हा निर्णय दिला.

न्यायमूर्ती अभय ओक यांच्या विरोधात राज्य सरकारनं तक्रार केली होती. त्यानंतर वकिलांच्या आंदोलनानंतर त्यांना ध्वनी प्रदूषणावर सुनावणी करणाऱ्या खंडपीठात पुन्हा सहभागी केलं होतं. न्यायमूर्ती ओक यांनी यावरून राज्य सरकारला चांगलंच फटकारलंही होतं. पण आता सुप्रीम कोर्टानंच न्यायमूर्ती ओक यांच्याकडून ही याचिका काढून घेतलीय.

अॅडव्हकेट्स असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया या संघटनेनं यासंदर्भात तीव्र शब्दांत मुख्य न्यायमूर्तींकडे आपला आक्षेप नोंदवला होता. अशा प्रकारे एका ज्येष्ठ आणि निष्ठावान न्यायमूर्तींवर राज्य सरकारकडून आरोप करणं आणि त्यानंतर त्यांच्याकडून याचिकेची सुनावणी काढून घेणं हे न्यायव्यवस्थेवरच अविश्वास दाखवण्यासारखं असल्याचं म्हटलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 6, 2017 07:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...