मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Weather Update: मुंबईवर गरुडाकृती ढगाचं सावट; हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा

Weather Update: मुंबईवर गरुडाकृती ढगाचं सावट; हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा

Weather Forecast: काल रात्री मुंबईत अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. यानंतर आजही मुंबईसह उपनगरात हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 16 जुलै: गुरुवारी रात्री मुंबईत अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक रस्ते तुडुंब भरून वाहत आहेत. तर वडाळा, सायन आणि गांधी मार्केट परिसरातील रस्त्यांना तर पुरस्थिती आली आहे. आजही मुंबईसह (Mumbai) उपनगरात हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा (Heavy rainfall alert) देण्यात आला आहे. पुढील चोवीस तासांत मुंबईत अतिवृष्टीचा धोका असल्याची माहिती हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आली आहे. तर काही भागात मध्यम ते मुसळधार स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

मागील चार तासांपासून मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे शहरातील रस्ते भरून वाहत आहेत. परिणामी अनेक रस्त्यांवरील वाहतूकचे मार्ग बदलण्यात आले आहेत. त्यासोबतच लोकल गाड्याही उशीरा धावत आहेत. ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेबरोबरच आता वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर देखील वाहतूकीचा खोळंबा झाला आहे. दहिसर चेक नाका परिसरात तर अतिवृष्टीनं कहर केल्यान रस्त्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा पाहायला मिळत आहेत.

खरंतर, सध्या अरबी समुद्राच्या काही भागात मोठ्या प्रमाणात ढगांची दाटी झाली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ढगांचा आकार हा गुरुड पक्ष्याप्रमाणे दिसत असून हे ढग मुंबईच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहेत. त्यामुळे पुढील चोवीस तास मुंबईत या गुरुडाकृती ढगांचं सावट कायम राहणार असून येत्या चोवीस तासांत अनेक ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळणार आहेत. हवामान खात्यानंतर मुंबईसह उपनगरांना रेड अलर्ट जारी केला आहे.

हेही वाचा-Corona Alert : लस घेऊनही कोरोना झालेल्या 80 टक्के नागरिकांमध्ये डेल्टा व्हायरस

सायंकाळी चार नंतर मुंबईसह उपनगरात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत मुंबई शहरात 64.45 मिलिमीटर, पूर्व उपनगरात 127.16 मिलिमीटर तर पश्चिम उपनगरात 120.67 मिलिमीटर पावसांची नोंद झाली आहे.

First published:

Tags: Mumbai, Weather forecast