हल्लाबोल थांबवायचा नाही, आता शांत बसायचं नाही -शरद पवार

विदर्भात रेशनवर गहू, तांदूळाऐवजी मका द्यायला सुरू केलाय. आता मक्याची भाकरी खायची. बाहेरच्या देशात जनावरांना मका दिला जातो

Sachin Salve | Updated On: Feb 28, 2018 10:33 PM IST

हल्लाबोल थांबवायचा नाही, आता शांत बसायचं नाही -शरद पवार

28 फेब्रुवारी : भाजपला सत्तेतून उतरवल्याशिवाय हल्लाबोल थांबवायचं नाही, आता आपण शांत बसायचं नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारविरोधात रणशिंग फुंकलंय.

सरकार विरोधात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात हल्लाबोल आंदोलन केल्यानंतर आज अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत हे आंदोलन करण्यात आलं.  शरद पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते या हल्लाबोल आंदोलनात सहभागी झाले. यावेळी नीरव मोदीच्या पीएनबी घोटाळ्यावरूनही शरद पवारांनी सरकारवर टीकास्त्र डागलंय.

संसाराला लागणार्‍या गोष्टींच्या किंमती महागल्या आहेत. सुरू असलेले कारखाने बंद होतायेत. समाजातल्या विविध घटकातील लोकांवर अन्याय होतोय. आता आम्हाला अच्छे दिन नको आधी होते ते बुरे दिन द्या असं म्हणण्याची वेळ आली असा टोला शरद पवारांनी लगावला.

तसंच देशात कोणतही राज्य असलं तरी सामान्यांना दोन वेळचं अन्न देण्याची जबाबदारी नाकारता येत नाही. विदर्भात रेशनवर गहू, तांदूळाऐवजी मका द्यायला सुरू केलाय. आता मक्याची भाकरी खायची. बाहेरच्या देशात जनावरांना मका दिला जातो. साधं तुम्हाला धान्य देता येत नाही.? देशात विक्रमी धान उत्पादन होत असताना ही स्थिती? तुम्हाला साधं धान्य देता येत नाही, तेलाच्या किंमती नियंत्रित ठेवता येत नाही असा सवालही पवारांनी उपस्थित केला.

आदिवासी, दलित, व्हिजेएनटी बाबत भूमिका घेणारं सरकार याला नादान सरकार म्हणायच की काय? अनेक जागा रिक्त आहेत पण त्या भरल्या जात नाहीत. यामुळे बेरोजगारीने थैमान घातलंय.

आता आपण शांत बसायचं नाही. यांना सत्तेतून उतरवल्याशिवाय हल्लाबोल थांबवायचं नाही असा निर्धार शरद पवारांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 28, 2018 10:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close