लाॅच्या परीक्षेत पुरवणी बंदीचा मुंबई विद्यापीठाचा फतवा, विद्यार्थिनींची कोर्टात धाव

लाॅच्या परीक्षेत पुरवणी बंदीचा मुंबई विद्यापीठाचा फतवा, विद्यार्थिनींची कोर्टात धाव

विधी शाखेच्या परीक्षा तोंडावर आल्या असल्या तरी विद्यार्थ्यांपुढच्या समस्या काही संपत नाहीये.

  • Share this:

12 डिसेंबर : मुंबई विद्यापीठाने पेपर तपासणीत घातलेल्या गोंधळानंतर आता एक अजब फतवा काढलाय. यापुढे विधी शाखेची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेसोबत पुरवणी मिळणार नाही असं फर्मानच मुंबई विद्यापीठानं जारी केलंय. याविरोधात एका विद्यार्थिनींने मुंबई उच्चन्यायालयात धाव घेतलीये.

मुंबई विद्यापीठाच्या पेपर तपासणीच्या समस्या आणि त्या सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना हायकोर्टाच्या माराव्या लागणाऱ्या चकरा काही संपता संपत नाहीये. विधी शाखेच्या परीक्षा तोंडावर आल्या असल्या तरी विद्यार्थ्यांपुढच्या समस्या काही संपत नाहीये.  यापुढे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेसोबत पुरवणी मिळणार नाही असं नवा फतवा मुंबई विद्यापीठाने काढलाय.

त्यामुळे विद्यापीठाच्या या निर्णयविरोधात विधी शाखेच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या मानसी भूषण या विद्यार्थीनीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय.

मुळात विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना बरीच मोठी उत्तर लिहावी लागतात. त्याअनुषंगाने त्यांना ३७ पानांची मुख्य उत्तरपत्रिका पुरणे तसं कठीणच, त्यांना पुरवण्या लागणं स्वाभाविक आहे.

मात्र पुरवणीमुळे उत्तर पत्रिकेच्या ऑनलाईन तपासणीत अडचणी येत असल्यामुळे मुंबई विद्यापीठाने हा निर्णय घेतल्याचं स्पष्टीकरण  न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती बी. पी. कोलाबावाला यांच्या खंडपीठासमोर दिलं.

तसंच मुख्य उत्तर पत्रिकेला एक विशिष्ठ बारकोड दिलेला असतो, पुरवणी उत्तर पत्रिकेला मात्र वेगळा बारकोड येतो. या फरकामुळे एका विद्यार्थ्याची पुरवणी दुसऱ्याला जाऊन त्यामुळे ऑनलाईन पेपर तपासणीत बराच गोंधळ उडाला होता अशी कबुलीही विद्यापीठाच्या दिली.

मात्र यावर नाराजी व्यक्त करत यासंदर्भात तातडीने उपाययोजना करून बुधवारी होणाऱ्या सुनावणीत उत्तर देण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहे. येत्या शनिवारपासून विधी शाखेची परीक्षा सुरू होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2017 09:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading