'मॅग्नेटिक महाराष्ट्रा'साठी पंतप्रधान मोदी आज मुंबईत, उद्धव ठाकरेंना निमंत्रणच नाही !

'मॅग्नेटिक महाराष्ट्रा'साठी पंतप्रधान मोदी आज मुंबईत, उद्धव ठाकरेंना निमंत्रणच नाही !

पंतप्रधान मोदी 'मॅग्नेटिक महाराष्ट्र', नवी मुंबई विमानतळ कोनशीला आणि जेएनपीटी बंदराच्या दुसरा टप्याचं उद्घाटन करणार आहेत.

  • Share this:

17 फेब्रुवारी : मुंबईत उद्या पंतप्रधान नरेंद मोदी मुंबईच्या दौऱ्यावर आहे. 'मॅग्नेटिक महाराष्ट्र', नवी मुंबई विमानतळ कोनशीला आणि जेएनपीटी बंदराच्या दुसरा टप्याचं उद्घाटन करणार आहेत. मात्र या तीन ही महत्वाच्या विकास कार्यक्रमात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजप सरकारकडून निमंत्रण देण्यात आलेलं नाहीये.

पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी या तीन ही प्रकल्पांची मोठी जाहिरातबाजी आणि श्रेय घेण्याचं भाजप सरकार प्रयत्न करतंय. त्यामुळे सत्तेत सहभागी असल्या शिवसेनेला भाजपने दूरच ठेवलंय.

दरम्यान, आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कोनशीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बसवण्यात येणार आहे. या कार्यक्रमात राज शिष्टाचारानुसार स्थानिक शिवसेना खासदार राजन विचारे निमंत्रण देण्यात आलेले नाहीये. त्यामुळे पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी शिवसेना काळे झेंडे दाखवून निदर्शने देखील करणार असल्याचं शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय मोरे यांनी सांगितलंय.

त्यामुळे भाजपने नेहमीप्रमाणे श्रेय घेण्यासाठी शिवसेनेला दूर ठेवलं अशी चर्चा राजकिय वर्तुळात सुरू आहे.

First published: February 17, 2018, 9:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading