मुंबई कुणाची? संजय निरुपम VS गजाजन कीर्तिकर, उत्तर -पश्चिम मुंबई कोण जिंकणार?

उत्तर पश्चिम मुंबईमध्ये काँग्रेसचे संजय निरुपम विरुद्ध शिवसेनेचे गजानन कीर्तिकर अशी लढत आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे गजानन कीर्तिकर यांनी काँग्रेसचे नेते गुरुदास कामत यांचा पराभव केला होता.

News18 Lokmat | Updated On: May 22, 2019 01:17 PM IST

मुंबई कुणाची? संजय निरुपम VS गजाजन कीर्तिकर, उत्तर -पश्चिम मुंबई कोण जिंकणार?

मुंबई, 14 मे : ऐन निवडणुकीत संजय निरुपम यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून झालेली हकालपट्टी आणि त्यांचा बदललेला मतदारसंघ यामुळे ते चर्चेत राहिले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष की उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेची उमेदवारी यापैकी त्यांनी उमेदवारीचा पर्याय निवडला. त्यांच्याऐवजी मिलिंद देवरा हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष झाले.

उर्मिला मातोंडकर यांना उत्तर मुंबईतून रिंगणात उतरवण्यामध्ये संजय निरुपम आणि मिलिंद देवरा यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते उर्मिला मातोंडकर यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या निमित्तानेही सगळ्यांसमोर आले.

उत्तर पश्चिम मुंबईमध्ये दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी पूर्व हे विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये मागच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे गजानन कीर्तिकर यांनी काँग्रेसचे नेते गुरुदास कामत यांचा पराभव केला होता. त्याआधी 2009 मध्ये इथून गुरुदास कामत हेच खासदार झाले होते. गुरुदास कामत यांचं 22 ऑगस्ट 2018 ला निधन झालं. आता या मतदारसंघाची मदार संजय निरुपम यांच्यावर आहे.

काँग्रेसमध्ये गटबाजी

अंधेरीसारख्या हिंदीभाषक मतदारांच्या उपनगरात संजय निरुपम यांना चांगला पाठिंबा मिळू शकतो पण काँग्रेसमधली अंतर्गत गटबाजी त्यांच्याविरोधात जाऊ शकते. या मतदारसंघात मराठी मतदारांचीही संख्या जास्त आहे. त्यामुळे शिवसेनेचे गजानन कीर्तिकर यांना त्याचा फायदा मिळू शकतो. त्यामुळेच गजानन कीर्तीकर आपला मतदारसंघ राखणार का याची चर्चा सुरू आहे. शिवसेनेची संघटनात्मक ताकद ही त्यांची जमेची बाजू मानली जाते.

Loading...

चुरशीच्या लढती

दक्षिण मुंबई, उत्तर मुंबई यासोबतच उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई या मतदारसंघात चुरशीच्या लढती पाहायला मिळत आहेत. मेट्रो रेल्वे, मोनोसारखे वाहतूक प्रकल्प आणि घरबांधणी यामुळे भाजपला मुंबईमध्ये फायदा होणार असला तरी नोटबंदी, जीएसटी, शहरी भागातली वाहतुकीची संरचना, प्रवाशांची सुरक्षितता या मुद्द्यांचं आव्हान भाजपसमोर आहे.

मनसे फॅक्टर

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद हाही मुंबईच्या निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा बनला होता. राज ठाकरे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य करत भाजप सरकारवर जोरदार टीका करत होते. याचा फटका भाजपला किती बसेल हे निकालातच कळेल. त्यांच्या सभांना होणाऱ्या गर्दीचा मतदानावर किती परिणाम होतो हाही प्रश्न आहे.

=======================================================================================

VIDEO: एखाद्याचा खून केल्यानं कुणी दहशतवादी होत नाही- शरद पोंक्षे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 14, 2019 03:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...