मुंबई कुणाची ? मनोज कोटक VS संजय दिना पाटील, ईशान्य मुंबईत वेगळी लढत

मुंबई कुणाची ? मनोज कोटक VS संजय दिना पाटील, ईशान्य मुंबईत वेगळी लढत

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना उमेदवारी नाकारल्यामुळे यावेळी ईशान्य मुंबईची लोकसभा निवडणूक सगळ्यात जास्त गाजली. भाजपतर्फे त्यांच्याऐवजी मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईमधली ही एकमेव जागा. इथून संजय दिना पाटील हेच पुन्हा निवडणूक लढवत आहेत.

  • Share this:

मुंबई, 14 मे : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना उमेदवारी नाकारल्यामुळे यावेळी ईशान्य मुंबईची लोकसभा निवडणूक सगळ्यात जास्त गाजली. भाजपतर्फे त्यांच्याऐवजी मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईमधली ही एकमेव जागा. इथून संजय दिना पाटील हेच पुन्हा निवडणूक लढवत आहेत.

मागच्या निवडणुकीत सोमय्यांचा विजय

ईशान्य मुंबईत घाटकोपर, मुलंड, कांजुरमार्ग याठिकाणी गुजराथी मतदारांचं प्रमाण जास्त आहे. मनोज कोटक गुजराथी असल्याने त्याचा फायदा त्यांना इथे मिळू शकतो, अशी चर्चा आहे.

मागच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील हेच इथून लढले होते. मोदी लाटेमध्ये त्यांचा जोरदार पराभव झाला आणि किरीट सोमय्या निवडून आले. यावेळी मात्र त्यांच्यासमोर भाजपचा नवा उमेदवार आहे.

मनसेचं प्राबल्य

ईशान्य मुंबई मतदारसंघात भांडुप, मुलुंड अशा भागात मनसेचं प्राबल्य आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भांडुपला झालेली सभा आघाडीसाठी किती फायद्याची ठरेल हे पाहावं लागेल. राज ठाकरेंच्या सभांना मिळणारा प्रतिसाद हा मुंबईच्या निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा बनला होता. राज ठाकरे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य करत भाजप सरकारवर जोरदार टीका करत होते. याचा फटका या मतदारसंघात भाजपला जास्त बसू शकतो पण त्यांच्या सभांना होणाऱ्या गर्दीचा मतदानावर किती परिणाम होतो हाही प्रश्न आहे.

वाहतूक आणि सुरक्षा

दक्षिण मुंबई, उत्तर मुंबई यासोबतच उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई या मतदारसंघात चुरशीच्या लढती पाहायला मिळत आहेत. मेट्रो रेल्वे, मोनोसारखे वाहतूक प्रकल्प आणि घरबांधणी यामुळे भाजपला मुंबईमध्ये फायदा होणार असला तरी नोटबंदी, जीएसटी, शहरी भागातली वाहतुकीची संरचना, प्रवाशांची सुरक्षितता या मुद्द्यांचं आव्हानही भाजपसमोर आहे.

=========================================================================

VIDEO: समर्थकांना भेटण्यासाठी प्रियांका गांधींनी ओलांडलं बॅरिकेड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 14, 2019 03:37 PM IST

ताज्या बातम्या