News18 Lokmat

मुंबईच्या वसाहतींमध्ये ओला कचरा उचलला जाणार नाही

सुरूवातीला मुंबईतल्या ५ हजार रहिवासी इमारतींमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. झोपडपट्यांचा कचरा मात्र बीएमसीचं उचलणार आहे. पण आयुक्तांनी परस्पर निर्णय घेतल्याचा आरोप करत या निर्णयाची अंमलबजावणी लगेच करु नये अशी मागणी केलीय.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 2, 2017 11:44 AM IST

मुंबईच्या वसाहतींमध्ये ओला कचरा उचलला जाणार नाही

मुंबई,02 ऑक्टोबर: आजपासून मुंबईतल्या वसाहतींमधून ओला कचरा उचलला जाणार नाही. मुंबईतल्या कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई महापालिकेनं हा उपाय शोधून काढलाय. पण महापालिकेच्या या निर्णयावर काही नगरसेवक नाराज असल्यामुळे तुर्तास ज्यांना लगेच या निर्णयाची अंमलबजावणी करु नये अशी मागणी केली जातेय. त्यामुळे ज्यांना लगेच शक्य नाही. त्या वसाहतींना लिखित परवानगी घेऊन पुढील तीन महिन्याच्या आत उपाययोजना करता येणार आहे.

महात्मा गांधींच्या जयंतीच्या निमित्तानं हा ऐतिहासिक निर्णय लागू करणार आहे. मुंबईत दररोज ९ लाख मेट्रीक टन कचरा निर्माण होतो. यातला ओला कचरा बीएमसीनं न उचलण्याचा निर्णय घेतलाय. सुरूवातीला मुंबईतल्या ५ हजार रहिवासी इमारतींमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. झोपडपट्यांचा कचरा मात्र बीएमसीचं उचलणार आहे. पण आयुक्तांनी परस्पर निर्णय घेतल्याचा आरोप करत या निर्णयाची अंमलबजावणी लगेच करु नये अशी मागणी केलीय. मुंबईत दररोज ९ मेट्रीक टन कचरा तयार होतो. त्यापैकी फार थोड्यावर प्रक्रिया होते. प्रक्रिया केल्यामुळे दीड मेट्रीक टन कचरा कमी झालाय. पण कचऱ्याचे वर्गीकरण केल्यास सगळ्याच कचऱ्याची विल्हेवाट लावणे शक्य होणार आहे. ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी नागरिकांवर देण्यात आली आहे.

वर्षानूवर्ष कचरा साठून मुंबईत कचऱ्याचे डोंगर तयार झाले आहेत. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची कुठलीच यंत्रणा बीएमसीकडे नाही. ओला आणि सुका कचरा एकत्र करण्यात आल्यानं या कचऱ्यापासून काहीच तयार केलं जावू शकत नाही. आणि आता कचरा टाकायला जागा शिल्लक नाही. त्यामुळे बीएमसीनं हा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. ज्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद द्यायला सुरुवात केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 2, 2017 11:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...