S M L

माहीमच्या भूमिगत बोगद्याच्या कामासाठी मुंबईत आज पाणीपुरवठा बंद!

माहीमच्या भूमिगत बोगद्याजवळ झडपेचं काम करण्यासाठी दक्षिण मुंबईत आज (गुरुवारी) पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

Sachin Salve | Updated On: Jan 18, 2018 09:21 AM IST

माहीमच्या भूमिगत बोगद्याच्या कामासाठी मुंबईत आज पाणीपुरवठा बंद!

18 जानेवारी : माहीमच्या भूमिगत बोगद्याजवळ झडपेचं काम करण्यासाठी दक्षिण मुंबईत आज (गुरुवारी) पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. काही भागांमध्ये पाणी पुरवठा कमी दाबानं केला जाईल.

मुंबई महापालिकेतर्फे माहीम भूमिगत बोगद्याजवळ १२०० मिमी व्यासाच्या झडपेच्या दुरुस्तीचे काम १८ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी मरोळ-मरोशी पासून रुपारेल कॉलेज ते रेसकोर्सपर्यंतचा जलबोगदा १२ तासांसाठी बंद करावा लागणार आहे. त्यामुळे आज मुंबईत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

या कामामुळे कुलाबा, काळबादेवी, गिरगाव, भायखळा, दादर, परळ, लोअर परळ, वरळी, वांद्रे या भागात आजच्या दिवशी पाणीपुरवठा होणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 18, 2018 09:21 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close