मुंबईतील 'या' भागांमध्ये 2 दिवस पाणीपुरवठा नाही, पाणी जपून वापरण्याचं आवाहन

मुंबईतील 'या' भागांमध्ये 2 दिवस पाणीपुरवठा नाही, पाणी जपून वापरण्याचं आवाहन

काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. तर काही परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

  • Share this:

मुंबई, 27 नोव्हेंबर : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ आणि ‘जी उत्तर’ विभागातील गावडे चौक, सेनापती बापट मार्ग येथे अस्तित्वात असलेल्या ब्रिटिशकालीन 1450 मिली मीटर व्यासाच्या तानसा (पूर्व) मुख्य जल वाहिनीवरील गळती दुरुस्त करण्याचे काम दिनांक 2 व 3 डिसेंबर रोजी हाती घेण्यात येणार आहे. सदर काम दिनांक 2 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजेपासून सुरु होऊन 3 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येईल. यामुळे सदर कालावधीत ‘जी दक्षिण’ आणि ‘जी उत्तर’ विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. तर काही परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

ज्या परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही, त्या परिसरांची नांवे व संबंधित तपशील पुढीलप्रमाणे आहेः

1. जी दक्षिण

बुधवार दिनांक 2.12.2020 रोजी दुपारी 2 ते 3 (डिलाईल रोड);

दुपारी 3.30 ते सायं. 7

(सिटी सप्लाय)

परिसर:- ना. म. जोशी मार्ग,

बी. डी. डी. चाळ, प्रभादेवी, जनता वसाहत, आदर्श नगर, एलफिस्टन (लोअर परळ);

या परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही.

2. जी उत्तर

बुधवार दिनांक 2.12.2020 रोजी सायं. 4 ते 7; तसेच सायं. 7 ते रात्री 10

परिसर:- एलफिस्टन (लोअर परळ), काकासाहेब गाडगीळ मार्ग, सेनापती बापट मार्ग, गोखले मार्ग, वीर सावरकर मार्ग, एल. जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, सेनाभवन परिसर, मोरी मार्ग, टि. एच. कटारीया मार्ग, कापड बाजार, माहीम (पश्चिम) पूर्ण परिसर, माटुंगा (पश्चिम) आणि दादर (पश्चिम) परिसर;

या परिसरांमध्ये पूर्णतः पाणीपुरवठा होणार नाही

3. जी दक्षिण

गुरुवार दिनांक 3.12.2020 रोजी पहाटे 4.30ते सकाळी 7.45 (डिलाईल रोड)

परिसर:- ना. म. जोशी मार्ग, बी. डी. डी. चाळ, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग

या परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही

तसेच ज्या परिसरांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे, त्या परिसरांची नांवे व संबंधित तपशील पुढीलप्रमाणे आहेः-

जी दक्षिण

गुरुवार दिनांक 3.12.2020 रोजी पहाटे 4 ते सकाळी 7 (क्लार्क रोड)

परिसर:- धोबी घाट, सातरस्ता; या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल

संबंधित परिसरातील नागरिकांनी आदल्या दिवशी पुरेसा पाणीसाठा करुन ठेवावा, तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करुन सदर जलवाहिनी गळती दुरुस्ती कालावधीमध्ये महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: November 27, 2020, 9:55 PM IST
Tags: BMCmumbai

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading