मुंबईत खाद्य पदार्थ विक्रीसाठी वृतपत्राचे कागद वापरण्यावर बंदी?

मुंबईत खाद्य पदार्थ विक्रीसाठी वृतपत्राचे कागद वापरण्यावर बंदी?

मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यावरचे खाद्य पदार्थ हे वृत्तपत्रांच्या कागदात बांधून दिले जातात. पण वृत्तपत्राची शाई ही आरोग्यास खूपच अपायकारक असते

  • Share this:

मुंबई,07 ऑक्टोबर: मुंबईत आता रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्री करताना वृत्तपत्रांच्या कागद वापरावर बंदी येण्याची शक्यता आहे.शिवसेनेने तशी मागणीच केली आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यावरचे खाद्य पदार्थ हे वृत्तपत्रांच्या कागदात बांधून दिले जातात. पण वृत्तपत्राची शाई ही आरोग्यास खूपच अपायकारक असते. त्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. या कागदाच्या वापारावर बंदी घाला अशी मागणी शिवसेनेचे वरळी भागातील नगरसेवक आशिष चेंबूरकर यांनी केली आहे. येत्या काळात या विषयावर चर्चा होऊन बंदी घातली जाण्याची शक्यता आहे.

त्यामुळे स्वस्तात मिळणाऱ्या वृत्तपत्राच्या कागदांऐवजी आता विक्रेते कुठले कागद वापरतील आणि ही बंदी कितपत पाळली जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल

First published: October 7, 2017, 10:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading