S M L

भल्ले शाब्बास !, मुंबई पोलिसांच्या नियोजनामुळे 'नो ट्रॅफिक जाम'

मुंबई वाहतूक पोलिसांनी योग्य नियोजन करून मराठा मोर्चाचा मार्ग तर मोकळा करून दिलाच मुंबईकरांचीही सुटका केली.

Sachin Salve | Updated On: Aug 9, 2017 07:04 PM IST

भल्ले शाब्बास !, मुंबई पोलिसांच्या नियोजनामुळे 'नो ट्रॅफिक जाम'

09 आॅगस्ट : मुंबई वाहतूक कोंडी होणे ही नवी गोष्ट नाही. पण त्यातच जर एखादा मोर्चा असले तर वाहतुकीवर ताण पडणार याची 100 टक्के हमी असते. पण मुंबई वाहतूक पोलिसांनी योग्य नियोजन करून मराठा मोर्चाचा मार्ग तर मोकळा करून दिलाच मुंबईकरांचीही सुटका केली.

मुंबईतील मराठा क्रांती मोर्चासाठी राज्यभरातून मराठा बांधव मुंबईत आले होते. काही ट्रेनने आले तर काही खाजगी वाहनं आणि बसमधून मुंबईत दाखल झाले. या मोर्च्यासाठी मुंबईत शेकडोंच्या संख्येने वाहनं आली. यामुळे मुंबईतील वाहतूक ठप्प होईल असा कयास बांधला गेला. पण मुंबई पोलिसांनी काटेकोररित्या नियोजन करून मुंबई खोळंबण्यापासून वाचवली. पोलिसांच्या नियोजनामुळेच पूर्व उपनगरात मुलुंड पासून ते सायनपर्यंत आणि मानखुर्द ते वडाळा रोडपर्यंत फारशी वाहतूक विस्कळीत झाली नाही. काही काळ वाहतूक कोंडी झाली असली तरीही वाहतूक पुढे सरकत राहील यासाठी पोलीस प्रयत्नशील राहिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 9, 2017 07:04 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close