मोर्चा घुसखोरांविरुद्ध, CAA आणि NRCला समर्थन नाही - राज ठाकरे

मोर्चा घुसखोरांविरुद्ध, CAA आणि NRCला समर्थन नाही - राज ठाकरे

आपण भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळ जात नाही हेच राज ठाकरे यांनी या बैठकीत स्पष्ट केलं असल्याचं बोललं जातंय.

  • Share this:

मुंबई 28 जानेवारी : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 23 जानेवारीच्या महामेळाव्यात पाकिस्तानी बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कडक भूमिका जाहीर केली होती. त्यानंतर राज यांचा CAA आणि NRCला पाठिंबा आहे असं बोललं जात होतं. घुसखोरांविरुद्ध मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणाही त्यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे यांनी आज कृष्णकुंजवर बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. या बैठकीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राज यांना नव्या भूमिकेवरून उपस्थित होत असल्याचं सांगितलं त्यावर राज ठाकरे यांनी त्यांच्या सर्व शंकांचं निरसन केलं. मोर्चा हा CAA आणि NRCच्या समर्थनासाठी नाही असं त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं. यावर चर्चा होऊ शकते मात्र समर्थन होऊ शकत नाही असंही त्यांनी सांगितलं.

नव्या भूमिकेमुळे राज ठाकरे हे भाजपच्या जवळ जात असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे आपण भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळ जात नाही हेच राज ठाकरे यांनी या बैठकीत स्पष्ट केलं असल्याचं बोललं जातंय.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी मुंबईतील रंगशारदा येथे आयोजित करण्यात आली होती. शॅडो कॅबिनेट आणि 9 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या मोर्चासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात येणार होती. या बैठकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे उशिरा आले होते. मात्र बैठक सुरू झाल्यानंतर केवळ 10 मिनिटांतच ते रंगशारदामधून बाहेर गेल्याची माहिती समोर आली.

महाविकास आघाडीतल्या वाचाळवीरांनी वाढवली उद्धव ठाकरेंची डोकेदुखी

राज ठाकरे बैठकीतून बाहेर पडल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांपुढे आपले मत व्यक्त केले.

NRC ला पाठिंबा देऊन मनसे भाजपच्या जवळ जात असल्याची लोकांमध्ये  प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. अशा भावना काही पदाधिकाऱ्यांनी नेत्यांपुढे मांडल्या. तसंच, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपण भाजप विरोधी भूमिका घेतली. मग आता NRC-CAA ला पाठिंबा देत भाजप बरोबर जात आहोत का? असा सवालही पक्षातील काही सदस्यांनी विचारला.

जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात गवळी सुप्रीम कोर्टात, शिवसेना नगरसेवक हत्या प्रकरण

दरम्यान, आजच्या या बैठकीत  09 फेब्रुवारीच्या मोर्चाचा यशस्वी करण्यासाठी राज ठाकरेंनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्यात. त्याचबरोबर मला हिंदूहृदयसम्राट म्हणणे बंद करा, आपण बाळासाहेबांची जागा घेवू शकत नाही, अशी सुचनाही राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केली.

First published: January 28, 2020, 2:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading