टॉप्स सिक्युरिटीकडून घोटाळा नाही, MMRDAचा अहवाल; प्रताप सरनाईक यांची झाली होती चौकशी

टॉप्स सिक्युरिटीकडून घोटाळा नाही, MMRDAचा अहवाल; प्रताप सरनाईक यांची झाली होती चौकशी

टॉप्स सिक्युरिटी प्रकरणात रमेश अय्यर यांनी तक्रार केली होती. या तक्रारीनंतर शिवसेना आमदार प्रताप सरणाईक यांची चौकशी ईडीकडून करण्यात आली, तसंच अमित चंडोले यांना अटक झाली.

  • Share this:

मुंबई, 21 डिसेंबर : टॉप्स कंपनीने MMRDA ला 500 सुरक्षा रक्षक कंत्राटानुसार दिले होते. त्यापैकी 70 टक्के सुरक्षा रक्षक कामावर येत होते. मात्र तरीही सर्वच 500 सुरक्षा रक्षकांचं वेतन काढलं जात असल्याचा आरोप रमेश अय्यर यांनी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे FIR मध्ये केला होता. त्यानंतर या आरोपांवर स्पष्टीकरण देताना MMRDA ने खुलासा करताना या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं अहवालात म्हटलं आहे.

MMRDA ने आर्थिक गुन्हे शाखेला दिलेलेल्या अहवालात MMRDA ने 2013 ते 2017 आणि 2017 ते 2020 या सहा वर्षातील निविदा प्रक्रियेत अनेक कंपन्यांनी सहभाग घेतला. त्यापैकी सहा कंपन्यांना निविदा प्रक्रियेत मान्यता देण्यात आली. या सहा कंपन्यांपैकी एक टॉप्स सिक्युरीटी कंपनीही होती. टॉप्स सिक्युरिटीला MMRDA ने सुरक्षा रक्षक पुरवण्याचं जे कंत्राट दिलं त्या कंत्राटानुसार MMRDA ला सुरक्ष रक्षक पुरवण्यात आले. या टॉप्स सिक्युरिटी कंपनीने पुरवण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांप्रमाणे निविदा प्रकियेत नमुद केल्याप्रकारे निधी देण्यात आला असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

तसेच MMRDA ला सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या सर्व कंपन्यांचे जे सुरक्षा रक्षक जितके दिवस गैरहजर राहिले त्या दिवसाचा दंड आकारून त्यांना दंडही करण्यात आल्याचं MMRDA ने त्यांच्या अहवालात म्हटलं आहे.

दरम्यान, याच प्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. टॉप्स सिक्युरिटी प्रकरणात रमेश अय्यर यांनी तक्रार केली होती. या तक्रारीनंतर शिवसेना आमदार प्रताप सरणाईक यांची चौकशी ईडीकडून करण्यात आली, तसंच अमित चंडोले यांना अटक झाली.

First published: December 21, 2020, 6:43 PM IST

ताज्या बातम्या