पावसाची मुंबईकरांना करावी लागणार प्रतिक्षा

पावसाची मुंबईकरांना करावी लागणार प्रतिक्षा

गेल्या आठवड्यापासून मुंबईतून पाऊस गायब झालाय. पुढील काही दिवस अशीच परिस्थिती कायम राहिल असा अंदाज आहे.

  • Share this:

09 जुलै: मुंबई आणि परिसर पुढील दोन तीन दिवस पावसाविना कोरडा राहणार, अशी चिन्हं आहेत. गेल्या आठवड्यापासून मुंबईतून पाऊस गायब झालाय. पुढील काही दिवस अशीच परिस्थिती कायम राहिल असा अंदाज आहे.

मान्सूनसाठी आवश्यक असलेला कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रात अजूनही तयार झालेला नाही. मुंबईत पुन्हा मान्सून सक्रिय होण्यासाठी अजूनही अनुकूल वातावरण निर्माण झालेलं नाही. त्यामुळे पाऊस मंदावला आहे. परिणामी, पुन्हा वातावरण तापलंय. शनिवारी मुंबईत सरासरी कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस ‌ नोंदवण्यात आलं. चोवीस तासात मुंबईत पावसाच्या एक-दोन सरी कोसळतील, तर तापमान सरासरी ३२ अंश सेल्सिअस राहिल, असा अंदाज आहे.

तलाव क्षेत्रातही पावसाची नोंद कमी झालीय. वैतरणा व मध्य वैतरणा येथे ४, अप्पर वैतरणामध्ये ३, भातसा व तानसा तलावात प्रत्येकी २ से.मी. पावसाची नोंद झालीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 10, 2017 08:41 AM IST

ताज्या बातम्या