Elec-widget

भारत-वेस्ट इंडिज सामन्यासाठी मुंबई पोलिसांची सुरक्षा नाही, हे आहे कारण

भारत-वेस्ट इंडिज सामन्यासाठी मुंबई पोलिसांची सुरक्षा नाही, हे आहे कारण

मुंबईत 6 डिसेंबरला भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये T 20 मॅच आहे. पण या मॅचसाठी पोलिसांची सुरक्षा देता येणार नाही, असं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई, २१ नोव्हेंबर : मुंबईत 6 डिसेंबरला भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये T 20 मॅच आहे. पण या मॅचसाठी पोलिसांची सुरक्षा देता येणार नाही, असं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. तसं पत्र मुंबई क्रिकेट असोसिएशनला पाठवण्यात आलं आहे. 6 डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकरांचा स्मृतिदिन आहे. या निमित्ताने शहरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. त्यामुळे वानखेडे स्टेडियमवरच्या सामन्यासाठी आपण सुरक्षा देऊ शकत नाही, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

Loading...

अयोध्येतल्या रामजन्मभूमीच्या वादग्रस्त जागेबद्दल सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. अयोध्येत राम मंदिर उभारण्याला सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदिल दिला आहे. त्यानंतर मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड फेरविचार याचिका दाखल करण्याचा विचार करतंय. 6 डिसेंबर 1992 ला अयोध्येत बाबरी मशीद पाडल्याची घटना घडली होती. अयोध्येतल्या रामजन्मभूमी प्रकरणी निकाल आल्यानंतरचा हा पहिलाच 6 डिसेंबर आहे. हा संवेदनशील दिवस असल्याने देशभरात कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईतही कडेकोट पोलीस बंदोबस्त असेल.

================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 21, 2019 04:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...