बैलगाडा शर्यतींना परवानगी नाही-मुंबई हायकोर्ट

जोपर्यंत बैलगाडी स्पर्धांदरम्यान बैलांना इजा होणार नाही हे सुनिश्चित करण्यासाठी सरकार नियम बनवत नाहीत, तोपर्यंत बैलगाडी स्पर्धांना परवानगी नाही असं मुंबई हायकोर्टाने ठणकावून सांगिलंय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Aug 16, 2017 02:14 PM IST

बैलगाडा शर्यतींना परवानगी नाही-मुंबई हायकोर्ट

विवेक कुलकर्णी, 16 आॅगस्ट : या वर्षीच्या बैलगाडी स्पर्धेसाठी परवानगी देण्यासाठी मुंबई हायकोर्टानं स्पष्टपणे नकार दिला आहे. बैलगाडी स्पर्धा हा क्रूर खेळ प्रकार असून बैलांना यामुळे मोठ्या प्रमाणात इजा होतं असं म्हणतं राज्य सरकारनं prevention of cruelty to animals या कायद्यात केलेल्या दुरुस्तीला आव्हान देणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते अजय मराठे यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने बैलगाडी स्पर्धांना परवानगी देण्यास नकार दिला आहे.

सुप्रीम कोर्टाने बैल हा धावण्यासाठी नाही तर शेतीची कामं करण्यासाठी आहे असं म्हटले होतं याचा हायकोर्टानं उल्लेख केला आणि बैलगाडी स्पर्धांना परवानगी देण्याचा बदल कसा केला अशी विचारणा राज्य सरकारला केली. राज्य सरकारनं जिल्हाधिका-यांमार्फत परवानगी दिली जाते आणि बैलांना इजा होणार नाही अशी हमी आयोजकांकडून घेतली जाते आणि तरीही ज्यांच्या नियमभंग होतो त्यांना ५ लाखांचा दंड आणि ३ वर्षांची शिक्षा करण्याची कायद्यात तरतूद आहे अशी माहिती राज्य सरकारनं दिली. पण त्या संदर्भातले नियम अजून तयार व्हायचे आहेत तोपर्यंत स्पर्धांना परवानगी देणार नाही असं राज्य कोर्टाला सांगितलं.

बैलांना इजा होणारच नाही हे पाहण्यासाठी कोणतीच यंत्रणा नाही आणि तसे नियमही नाहीत त्यामुळे त्या संदर्भातले नियम पहिले तयार करा, ते आमच्यासमोर दोन आठवड्यात सादर करा आणि मग या स्पर्धांवर परवानगी द्यायची की नाही हे आम्ही ठरवू असं हायकोर्टानं स्पष्ट केलं आहे. यंदाचा बैलपोळा हा येत्या सोमवारी असल्यानं यंदा या स्पर्धा होऊ शकणार नाहीत हे आता स्पष्ट झालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 16, 2017 01:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...