मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

उद्धव ठाकरेंना कुणी मुख्यमंत्री मानत नाही, फडणवीसांचा घणाघात

उद्धव ठाकरेंना कुणी मुख्यमंत्री मानत नाही, फडणवीसांचा घणाघात

 मी तुम्हाला सांगतो. कशाला लपवायचं? आज माझं वजन 102  किलो आहे. जेव्हा बाबरी पाडायला गेलो तेव्हा 128  होतो'

मी तुम्हाला सांगतो. कशाला लपवायचं? आज माझं वजन 102 किलो आहे. जेव्हा बाबरी पाडायला गेलो तेव्हा 128 होतो'

'मालेगाव, नांदेडमध्ये जे झाले ती साधी घटना नाही तर हा प्रयोग देशातील मायनोरिटीला पोलराईज करून त्यांना सरकारविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न आहे'

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 16 नोव्हेंबर : 'महाराष्ट्राच्या विश्वासहर्तेवर प्रश्न निर्माण झाले आहे. एक मुख्यमंत्री आहेत त्यांना इतर कुणी मुख्यमंत्री मानत नाही आणि मंत्री आहे की जे स्वत:ला मुख्यमंत्री मानतात. त्यामुळे जनतेच्या प्रश्नावर बोलायला कुणाला वेळ नाही', असं म्हणत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांच्यावर टीकास्त्र सोडले.

मुंबईमध्ये भाजपची कार्याकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. देवेंद्र फडणवीस यांनीही अमरावती हिंसाचार प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.

भाषणाच्या सुरुवातील देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना अतिशय वेगात स्वास्थलाभ व्हावा यासाठी शुभेच्छा दिल्या. पण, महाराष्ट्राच्या विश्वासहर्तेवर प्रश्न निर्माण झाले आहे. एक मुख्यमंत्री आहेत त्यांना इतर कुणी मुख्यमंत्री मानत नाही आणि मंत्री आहे की जे स्वत:ला मुख्यमंत्री मानतात. त्यामुळे जनतेच्या प्रश्नावर बोलायला कुणाला वेळ नाही. आपल्या काळात प्रकल्पांवर चर्चा होते. आज चर्चा कशावर होते तर गांजा, हर्बल तंबाखूवर होते.  महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणुन यांची नोंद होईल, अशी टीका फडणवीस यांनी केली.

'मला जमिनीवर उतरवणारी..'असं म्हणत समीर चौगुलेंची पत्नीसाठी खास पोस्ट

'हे कायद्याचे राज्य नाही. सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारचे कपडे काढले तरी हे निर्लज्ज आहे. त्यामुळे आपल्याला रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल. ज्यापद्धतीने देशद्रोह्यांबरेबर तुमची पार्टनरशीप, अवैध रेती, अवैध दारू असाच प्रकार महाराष्ट्रात सुरू आहे. भ्रष्टमार्गाने चालायची सवय नोकरशाहीला लागली तर ती लवकर जात नाही. कोटी कोटी रूपये देवून लोक पदावर येत असतील तर काय होईल. आपण या विरूद्ध संघर्ष करायचा आहे.लढाई समोरासमोर लढावी लागते, असंही फडणवीस म्हणाले.

आपल्याकडे नामीही नाही आणि बेनामी ही नाही. जे मालेगाव नांदेडमध्ये जे झाले ती साधी घटना नाही तर हा प्रयोग देशातील मायनोरिटीला पोलराईज करून त्यांना सरकारविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न आहे. त्रिपुरात कार्यालय जाळले होते ते मशिद जाळले म्हणून दाखवले. संपुर्ण देशात अनरेस्ट तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. पण आश्चर्य म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना असे काहीच घडले नाही याची पुर्ण कल्पना असून सुद्धा टि्वट करतात, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.

सरकारला माहिती नव्हती, आयबीला माहिती नव्हती. मग निवडून निवडून हिंदुंची दुकाने जाळली तेव्हा महाविकास आघाडीचा एक मंत्री बोलत नाही. मला तर आश्चर्य वाटत संजय राऊत यांचे, कोण होतास तू काय झालास तू असे वेडा असा कसा वाया गेलास तू, नवाब मलिक यांना काय म्हणायचे हर्बलमुळे, असा टोलाही फडणवीसांनी राऊत यांना लगावला.

Va Tech Wabag शेअरमध्ये आज 7 टक्क्याहून अधिकची तेजी; तज्ज्ञांचा काय आहे सल्ला?

'मला तर वाटतं की त्यांना पुर्ण माहिती आहे की कुठून कुठून फंडींग झाले. ते कव्हर फायर करत आहेत.आझाद मैदानात काय झालं तोच पॅटर्न इथे दिसतोय. आम्ही दंगल करणारे लोक नाही. पण जर कोणी अंगावर धावून आलो तर आम्ही ते सहन करणार नाही. सरकारला वाटत असेल की आम्ही सत्तेत आहेत काहीही करू तर तसे होणार नाही, आम्ही रस्त्यावर उतरू.  भाजपचा कार्यकर्ता कुठल्याही निष्पाप लोकावर हल्ला करणार नाही. एखाद्यावेळेस अल्पसंख्याकाला भाजपचा कार्यकर्ता मदत करेल. पण जर आमच्यावर कुणी चाल करून आलं तर आम्ही त्याला सोडणार नाही, असा इशाराही फडणवीसांनी दिला.

मोदींच्या विकासाला उत्तर देता येत नाही म्हणून असे धंदे करतात. निवडणूक येता जातील आपले जुने हिदुत्ववादी मित्र होते ते अजान स्पर्धा घेत असतील जनाब बाळासाहेब म्हणत असतील तर त्यांना  लखलाभ. त्यांना अमराठी काय पण मराठी पण मतदान करणार नाही, असंही फडणवीस म्हणाले.

'फ्रान्समध्ये एक खटला खूप गाजला होता. एक कोंबडा सकाळी बाग देत होता, त्यानंतर तो दुपारी बाग द्यायला लागला. त्यानंतर लोक कोर्टात गेले. दुपारी कोंबडा बांग देत असेल तर योग्य नाही. आता तर सकाळी दुपारी आणि संध्याकाळी कोंबडे टीव्हीवर दिसत आहे, असं म्हणत फडणवीसांनी नवाब मलिक यांचा नाव न घेता टोला लगावला.

First published:

Tags: BJP