मुंबईत म्हाडाच्या लॉटरीत यंदा 1000 घरं?

गेल्या वर्षी घरांची संख्या कमी होती आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी एकही घर नव्हतं. त्यामुळे 'म्हाडा'वर टीका झाली होती. म्हणूनच यंदा घरांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू झाले असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ४००, तर मध्यम उत्पन्न गटासाठी सुमारे २०० घरे उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Mar 25, 2018 09:00 PM IST

मुंबईत म्हाडाच्या लॉटरीत यंदा 1000 घरं?

25 मार्च: आता मुंबईत घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक खुश खबर आहे. 'म्हाडा'च्या या वर्षीच्या लॉटरीत सुमारे एक हजार घरांचा समावेश करण्याचा प्रयत्न सुरू झालाय.

गेल्या वर्षी घरांची संख्या कमी होती आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी एकही घर नव्हतं. त्यामुळे 'म्हाडा'वर टीका झाली होती. म्हणूनच यंदा घरांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू झाले असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ४००, तर मध्यम उत्पन्न गटासाठी सुमारे २०० घरे उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुर्बल घटकांसाठी मानखुर्दमध्ये १०० तर, अॅन्टॉप हिलमध्ये ३०० घरे राखून ठेवण्याची तयारी म्हाडानं सुरु केलीय. मात्र यावर्षीच्या घरांच्या किंमती अजून निश्चित झालेल्या नाहीत.. रेडी रेकनरचे दर, जीएसटी यानुसार लवकरच घरांचे दर जाहीर होतील, असं म्हाडाकडून सांगण्यात आलंय.

या भागात घरे...

मानखुर्द, मुलुंड गव्हाणपाडा, विक्रोळी कन्नमवार नगर, घाटकोपर पंतनगर, अॅन्टॉप हिल, गोरेगाव, बोरिवली महावीर नगर

घरांची संख्या

Loading...

आर्थिक दुर्बल गट- सुमारे ४००

अल्प उत्पन्न गट- ३८०

मध्यम उत्पन्न गट- २००

उच्च उत्पन्न गट- ४

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 25, 2018 09:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...