मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईत यापुढे परदेशी झाडांची लागवड नाही, पालिकेचा महत्त्वाचा निर्णय

मुंबईत यापुढे परदेशी झाडांची लागवड नाही, पालिकेचा महत्त्वाचा निर्णय

 जेव्हा कधी एखादं नैसर्गिक संकट येत तेव्हा या संकटांना बळी पडणारी ही परदेशी झाडं असतात आणि म्हणूनच...

जेव्हा कधी एखादं नैसर्गिक संकट येत तेव्हा या संकटांना बळी पडणारी ही परदेशी झाडं असतात आणि म्हणूनच...

जेव्हा कधी एखादं नैसर्गिक संकट येत तेव्हा या संकटांना बळी पडणारी ही परदेशी झाडं असतात आणि म्हणूनच...

मुंबई, 24 मार्च : मुंबई म्हटलं तर जितकं ग्लोबल हे शहर तितकीच ग्लोबल इथली विविधता. पण सगळ्याच ग्लोबल बाबी या शहराच्या वातावरणाला आणि हवामानात चपखल बसतील असं नाही ना. अनेक परदेशी झाडं (Tree Planting) इथे दिमाखात उभे असतीलही, बहरत असतील अगदी भारतीय झाडांना वाकुल्या दाखवीत. पण जेव्हा कधी एखादं नैसर्गिक संकट येत तेव्हा या संकटांना बळी पडणारी ही परदेशी झाडं असतात. आणि म्हणूनच आता यापुढे परदेशी झाडांची लागवड न करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) घेतला आहे.

'वृक्षवल्ली आम्हा सोयरे'' असे सांगणाऱ्या आपल्या संस्कृतीने झाडे लावण्याचे आणि त्यांच्या संवर्धनाचे महत्त्व नेहमीच अधोरेखित केले आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने तर वृक्षारोपणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र, वृक्षारोपण करताना स्‍थानिक प्रजातींची व बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील मातीची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन मुंबईतील मातीत रुजेल, वाढेल आणि अधिक घट्टपणे मूळ धरेल अशी झाडे लावणे आवश्यक आहे. स्‍थानिक प्रजातींच्‍या झाडांऐवजी इतर प्रजातींची झाडे लावल्‍यास ती मुंबईच्‍या मातीमध्‍ये घट्टपणे मूळ धरत नाहीत. परिणामी अशी झाडे पडण्‍याचा धोका अधिक असतो. ही बाब लक्षात घेऊन वृक्षप्राधिकरणाने स्‍थानिक प्रजातींची झाडे लावण्‍याच्‍या धोरणास मंजुरी दिली आहे.

धारावी नव्हे हा उच्चभ्रू परिसर कोरोनाचा नवा हॉटस्पॉट; मुंबईकरांनो इथं जाणं टाळा

' बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या स्तरावर स्‍थानिक प्रजा‍तींची झाडे लावण्‍यास प्राधान्‍य देण्‍यात येणार आहे. पण नागरिकांनी  तसेच नागरिकांनी देखील त्‍यांच्‍या सोसायटी परिसरात  प्रांगणात झाडे लावतांना स्‍थानिक प्रजातींचीच झाडे लावावी, असं महापालिका आयुक्‍त  इकबाल चहल यांचं म्हणणं आहे.

'आज मंजूर झालेल्‍या धोरणानुसार स्‍थानिक प्रजातींच्‍या झाडांमध्‍ये सध्‍या 41 प्रजातींचा समावेश करण्‍यात आला आहे,  ही यादी आम्ही पालिकेच्या संकेतस्थळावर देत आहोत. ज्याचा संदर्भ घेत मुंबईचे नागरिक आपापल्या सोसायटीच्या आवारात या झाडांची लागवड करू शकतात' अशी  माहिती वृक्ष प्राधिकरणाचे सचिव तथा उद्यान अधिक्षक जितेन्‍द्र परदेशी यांनी दिली.

मागच्या काही वर्षात झाडं उन्मळून पडलेल्या ठिकाणीपण या 41 पैकीच झाडं लावली जाणार आहेत. विविध कारणांमुळे वृक्ष उन्‍मळून पडल्‍यास त्‍या वृक्षाच्‍या जागी स्‍थानिक प्रजातींचीच झाडे लावण्‍यात येणार आहेत.

ती 41 झाडं कोणती?

वड, पिंपळ, उंबर, कांचन, कदंब, गुंज, पळस, निम, महोगनी, मोह, बहावा, साग, अर्जुन, ऐन, किंजळ, सीता अशोक, उंडल, नागकेशर, चंपा, शिवन, शिरीष, करंज, बकुळ, बेल, तामण, हिरडा, बेहडा, नारळ, आवळा, खैर, तेतू, आंबा, पुत्रंजीवा, जंगली बदाम, बिब्‍बा, पारिजातक, रिठा, चंदन, कुंभ, फणस, चाफा.

राम गोपाल वर्मांनी केलं कंगना रणौतचं कौतुक, अभिनेत्रीची प्रतिक्रिया VIRAL

मुंबईत परदेशी प्रजातीची झाडं असलेल्या रेनट्री हे पिवळे फुलं येणारी अनेक झाडं अचानक सुकू लागली होती. मुंबईच्या अनेक रस्त्यावर दाटी करत उभी असलेली ही झाडं जेव्हा अचानक निस्तेज होऊ लागली तेव्हा यांना मुद्दाम  मारलं जातंय की काय अशीही एक शंका नागरिकांच्या मनात येऊ लागली. पण अनेक वृक्षप्रेमींनी याचा पाठपुरावा घेतला तेव्हा लक्षात आलं की झाडावरच्या किडीमुळे हे घडत आहे.  पान त्यावर कोणताही उपाय नसल्याने शेकडो झाडं सुकून गेली.

मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांना कोर्टाचा झटका; कुंभमेळ्याचे नियम अधिक कडक

मुंबई उष्णकटिबंधीय क्षेत्रात येतं. समुद्रसपाटीपासून अवघ्या चौदा मिटर उंचीवर असलेल्या मुंबईत जवळपास सरासरी 90 इंच पाऊस दर वर्षी पडतो. मुंबई हे सात बेटांचा बनलेला एक भव्य बेट आहे. त्यामुळे सहाजिकच आहे अतिवृष्टी पूर चक्रीवादळ अशा नैसर्गिक समस्यांचा धोका सातत्यानं मुंबईवर असतो. दरवर्षीच्या पावसाळ्यात शेकडो झाड उन्मळून पडत असतात. आणि पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्ये हरितपट्टा वेगानं नष्ट होण्यास कारणीभूत ठरतं. पण त्या ऐवजी कोणती झाडे लावली जावी यासाठी एक कोणतीच एकसमान पद्धत ग्राह्य धरली जात नाही.

मागच्या 4 वर्षात एकूण 3469 झाडं उन्मळून पडली. पैकी पालिकेची 1038 आणि खाजगी सोसायटीच्या आवारातील 2438 झाडं होती.

झाड लावताना ते फुलझाड आहे की फळझाड आहे यावर त्याचं किती वय असताना त्याची लागवड केली पाहिजे. याचं धोरणही पालिकेने ठरवलं आहे.

First published:

Tags: BMC, India, International, Mumbai muncipal corporation, Tree plantation, मुंबई