Home /News /mumbai /

Mumbai : हॉटेल ट्रायडंटजवळ झाड-इमारत कोसळल्याचा Viral Video आहे Fake, जाणून घ्या सत्य

Mumbai : हॉटेल ट्रायडंटजवळ झाड-इमारत कोसळल्याचा Viral Video आहे Fake, जाणून घ्या सत्य

Truth of Viral Video एका दुसऱ्या ट्वीटमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार हा व्हिडिओ मागच्या वर्षीच्या जुलै महिन्यातला आहे. अरबमधील मदिना इथं ही घटना घडली होती, असा दावा या ट्विटमध्ये करण्यात आला आहे.

    मुंबई, 17 मे : तौक्ते चक्रीवादळाच्या (Cyclone Tauktae) पार्श्वभूमीवर काही फेक न्यूजदेखिल (Fake News) पसरत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये नरीमन पॉइंटवर (Nariman Point) ट्रायडंट हॉटेलजवळ (Trident hotel) झाडे आणि इमारतीचा काही भाग कोसळल्याचा एक व्हिडिओ व्हायरस होत आहे. पण हा व्हिडिओ जुना असून अशी कोणतीही घटना मुंबईत घडलेली नसल्याचं समोर आलं आहे. (fake video) (वाचा- खवळलेव्या समुद्रात अडकले 273 कर्मचारी, INS Kochi निघाली वाचवण्यासाठी, Video) तौक्ते चक्रीवादळानं मुंबई आणि किनारपट्टीच्या भागामध्ये मोठ्या वादळी वाऱ्यामुळं तडाखा बसला आहे. काही ठिकाणी झाडं उन्मळून पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. पण फार मोठं नुकसान होणारी घटना अद्याप समोर आलेली नाही. मात्र सोशल मीडियावर या वादाळाच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये इमारतीच्या बाहेर उभ्या असलेल्या चारचाकी गाड्यांवर इमारतीचा भाग कोसळून त्या गाड्यांचं मोठं नुकसान झालेलं दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हा प्रकार मुंबईतला नरीमन पॉइंटवरील ट्रायडंट हॉटेलजवळचा असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता यापरिसरात अशी कोणतीही घटना घडलीच नसल्याचं समोर आलं. त्यामुळं सोशल मीडियावर व्हारल होत असलेला हा व्हिडिओ फेक असल्याचं समोर आलं आहे. एका दुसऱ्या ट्वीटमध्ये करण्यात  आलेल्या दाव्यानुसार हा व्हिडिओ मागच्या वर्षीच्या जुलै महिन्यातला आहे. अरबमधील मदिना इथं ही घटना घडली होती, असा दावा या ट्विटमध्ये करण्यात आला आहे. (वाचा-मुंबईत हवामान खात्याचा नवा इशारा; पुढचे काही तास तुफान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस) दरम्यान, पुढच्या काही तासांत मुंबईत जोरदार वाऱ्यांसह अतिमुसळधार पाऊस पडेल, असं IMD ने सांगितलं आहे. वाऱ्याचा वेग काही ठिकाणी कमाल ताशी 120 किमी पर्यंत पोहोचण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकर, ठाणेकरांनी सावध राहावं. गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cyclone, Mumbai, Video viral

    पुढील बातम्या