घुसखोरांना ज्यांना मांडीवर बसवायचं त्यांनी बसवावं, आम्ही हाकलणारच - उद्धव ठाकरे

घुसखोरांना ज्यांना मांडीवर बसवायचं त्यांनी बसवावं, आम्ही हाकलणारच - उद्धव ठाकरे

'घुसखोर हे देशाच्या सुरक्षेलाच धोका असून त्यांना बाहेर काढलेच पाहिजे. भारत हा काही धर्मशाळा नाही.'

  • Share this:

मुंबई 9 सप्टेंबर : घुसखोर बांग्लादेशी आहेत त्यांना देशाच्या बाहेर काढायलाच हवे...कोणी त्यांना मांडीवर बसविण्याचा प्रयत्न करत असेल त्यांनी बसवावे असं मत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. घुसखोर हे देशाच्या सुरक्षेलाच धोका असून त्यांना बाहेर काढलेच पाहिजे. भारत हा काही धर्मशाळा नाही असंही ते  म्हणाले. युती च्या बैठकी बाबत बोलताना ते म्हणाले, एक दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझी बैठक होणार आहे. इतर लोकांना काय बोलायचं आहे त्यांनी बोलावे. प्रकाश आंबेडकरांनी शिवसेनेवर बोलण्यापेक्षा ओवेसी वर बोलावे तेच योग्य राहिल असा टोलाही त्यांनी लगावला.

सध्या  सुरू असलेल्या गड किल्ल्याच्या वादावरही त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. महाराजांच्या गडकिल्ल्याबाबत कोणी वेडे वाकडे करेल असे वाटत नाही म्हणून मी आता पर्यंत काही बोललो नाही. असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे सरकारचा बचावच केला. यावादावर याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनीही खुलासा केला आहे.

अवधूत तटकरेंचा कार्यकर्त्यांसह सेनेत प्रवेश, राष्ट्रवादी सोडली कारण...!

लवकरच ठरणार युतीचा फॉर्म्युला

विधानसभा निवडणुकीसाठी  'युती'चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये अंतिम चर्चेला सुरुवात झालीय. या आधी प्राथमिक चर्चा झाली असली तरी ही चर्चा अंतिम फॉर्म्युला ठरविण्यासाठी असल्याने त्याला महत्त्व प्राप्त झालंय. चर्चेच्या काही फेऱ्या झाल्या असून अजुन काही फेऱ्या होणार आहेत. झालेल्या चर्चेचा तपशील दोन्ही पक्षांचे नेते आपापल्या ज्येष्ठ नेत्यांना देत आहेत. अंतिम तोडगा निघाल्यानंतरच भाजपचे अध्यक्ष आणि उद्धव ठाकरे भेटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. गणेश विसर्जनापूर्वी हा तोडगा निघणार असल्याची शक्यता आहे.

बैठक संपल्यानंतर उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी दिली 'ही' माहिती

भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन हे चर्चा करत असून शिवसेनेकडून सुभाष देसाई त्यात सहभागी आहेत. आज या सर्व नेत्यांमध्ये चर्चेच्या काही फेऱ्या झाल्यात मित्र पक्षांना द्यावयाच्या जागा आणि त्यानंतर दोन्ही पक्षांनी लढायच्या जागा, काही जागांची अदलाबदल अशा सर्व विषयांवर यात चर्चा झाली.

( वाचा : वंचित-MIMच्या युतीवर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले? पाहा VIDEO )

निवडून येण्याची ताकद हाच सर्वात महत्त्वाचा निकष असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय. काही ठिकाणी दोन्ही दोन्ही पक्षांचा दावा असून तिथेच थोडा पेच निर्माण झालाय. मात्र चर्चेच्या माध्यमातून हे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा विश्वास दोन्ही पक्षांनी व्यक्त केलाय.

या चर्चानंतर चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना चर्चेची सर्व माहिती दिली. भाजप शिवेसेनेच्या बैठकीत काही जागांच्या अदलाबदली विषयी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तसंच घटकपक्षांना नेमक्या कोणत्या 18 जागा द्यायच्या याविषयी बैठकीत चर्चा झाली.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 9, 2019, 7:40 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading