मुंबईच्या महापौरांना घर मिळेना!

मुंबईच्या महापौरांना घर मिळेना!

आज सुधार समितीनं महापौर बंगल्याचं आरक्षण बदलून स्मारकासाठी राखीव केलं आहे. पण त्यामुळे महापौर बंगला कुठे असेल हा जुनाच प्रश्न पण नव्या क्लिष्टतेसह पुढे आलाय. महापौर बंगल्यासाठी सुचवण्यात आलेली राणीच्या बागेतील बंगला हा शांतता क्षेत्र येत असल्याने महापौरांना ते नको आहे. तर मलबार हिल परिसरातील दोन बंगले प्रशासकीय अधिकारी राहत आहेत.

  • Share this:

मुंबई, 28 नोव्हेंबर:  मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर सध्या जरी महापौर बंगल्यात राहात असले तरी लवकरचं त्यांना ते घर सोडावं लागणार आहे. हे घर सोडताना त्यांना आनंदच होईल कारण त्यानंतरचं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक त्याठिकाणी बांधले जाणार आहे.

आज सुधार समितीनं महापौर बंगल्याचं आरक्षण बदलून स्मारकासाठी राखीव केलं आहे. पण त्यामुळे महापौर बंगला कुठे असेल हा जुनाच प्रश्न पण नव्या क्लिष्टतेसह पुढे आलाय. महापौर बंगल्यासाठी सुचवण्यात आलेली राणीच्या बागेतील बंगला हा शांतता क्षेत्र येत असल्याने महापौरांना ते नको आहे. तर मलबार हिल परिसरातील दोन बंगले प्रशासकीय अधिकारी राहत आहेत.

पूर्वी यापैकी एका बंगल्यात बीएमसीच्या तत्कालीन अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे राहात होत्या. तर दुसऱ्या बंगल्यात अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी राहात आहेत. सध्या पल्लवी दराडे महापालिकेत नसल्यामुळे महापालिकेचा हा बंगला खरंतर त्यांनी रिकामा करायला हवा होता. पण पल्लवी दराडेंचे पती प्रवीण दराडे हे सुद्धा प्रशासकीय सेवेत आहेत. शिवाय ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहे. त्यामुळे दराडेंनी २०२७ पर्यंत तो बंगला स्वतः राहाण्यासाठी घेतला असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. त्यामुळे तूर्तास संजय मुखर्जी आणि प्रवीण दराडे हे दोघेही हे बंगले सोडण्याची शक्यता कमी आहे.

त्यामुळेच शिवसेनेनंही बंगला शोधण्याची जबाबदारी प्रशासनावर सोडून दिलीय. त्यात पेडर रोडवरील आयुक्तांच्या बंगल्यासाठी शिवसेना आग्रही आहे. हीच वास्तू महापौरांच्या स्थानाला शोभून दिसणारी आहे असं मत सेनेतील नेते व्यक्त करताहेत. त्यामुळे महापालिकेच्या अखत्यारीत असलेला कोणता बंगला महापौरांना दिला जातो हे पहावं लागेल. किमान तोवर तरी महापौरांना घर मिळत नसल्याचं चित्र आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2017 09:13 PM IST

ताज्या बातम्या