Elec-widget

राणेंना शिवसेनेत ठेवलंत, तर मी घर सोडून जाईन; उद्धव ठाकरेंची बाळासाहेबांना धमकी

राणेंना शिवसेनेत ठेवलंत, तर मी घर सोडून जाईन; उद्धव ठाकरेंची बाळासाहेबांना धमकी

राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या सनसनाटी आत्मचरित्राची पहिली झलक समोर आली आहे.

  • Share this:

मुंबई, 07 मे: राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या सनसनाटी आत्मचरित्राची पहिली झलक समोर आली आहे. स्वाभीमान संघटनेचे अध्यक्ष नारायण राणे यांनी त्यांच्या 'नो होल्डस बँरेड' या आत्मचरीत्रात अनेक वादग्रस्त घटनांना उजाळा दिला आहे. विशेष करून शिवसेना पक्ष सोडताना झालेले राजकीय आरोप प्रत्यारोपांना नारायण राणेंनी वाट मोकळी केली आहे. या आत्मचरित्रात नारायण राणेंचा वादग्रस्त राजकीय प्रवास कसा झाला हे देखील मांडण्यात आला आहे. लवकरच या वादग्रस्त आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात येणार आहे. याची पहिली झलक अॅमेझॉनवर पाहायला मिळत आहे.

नारायण राणेंना शिवसेनेत ठेवले, तर मी घर सोडून जाईन, अशी धमकी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिली होती, असा खळबळजनक दावा नारायण राणेंनी त्यांच्या आत्मचरित्रात केला आहे. राणेंना पक्षात ठेवले तर मी आणि रश्मी घर सोडून जाऊ, असे उद्धव म्हणाले होते, अस राणेंनी म्हटले आहे. पण त्याचवेळी राणेंनी थोडी बाजू सावरण्याचाही प्रयत्न केलाय. उद्धव माझे शत्रू नाहीत, आमचे वैचारिक मतभेद आहेत, अस राणेंनी लिहिले आहे. तसेच, आजची शिवसेनेची अवस्था आहे, त्याला मनोहर जोशीच जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

राणेंच्या आत्मचरित्रातील गौप्यस्फोट

- राणेंना शिवसेनेत ठेवलंत, तर घर सोडून जाईन अशी धमकी उद्धव ठाकरेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना दिली होती.

- शिवसेनेच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर बाळासाहेबांनी आपल्याला बोलावले होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना स्पष्ट सांगितले होते, की राणेंना पक्षात ठेवले तर मी आणि रश्मी घर सोडून जाऊ

Loading...

- उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, फक्त वैचारिक मतभेद आहेत

- मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री पदावरून हटवून मला मुख्यमंत्री केले. त्यामुळे मनोहर जोशींचा माझ्यावर राग आहे. मनोहर जोशींनी माझ्या विरोधात उद्धव ठाकरेंचे कान भरले

- मनोहर जोशींमुळे शिवसेनेची आज ही अवस्था झालीये.


SPECIAL REPORT : भाईचा Bday.., शिवसेना-भाजप पदाधिकाऱ्याने मिळून कापला 'आरारा' स्टाईल केक!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 7, 2019 07:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...