मुंबईत अवजड वाहनांना दिवसा प्रवेश नाही

मुंबईत दररोज होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Sep 13, 2017 10:28 AM IST

मुंबईत अवजड वाहनांना दिवसा प्रवेश नाही

मुंबई, 13 सप्टेंबर:  मुंबईच्या वाहतूक  विभागाने सकाळी 7 पासून रात्री 12 पर्यंत अवजड वाहनांना प्रवेश न देण्याचं नोटिफिकेशन काढलं आहे.मुंबईत दररोज होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

मुंबईत दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या वाहनांचा परिणाम वाहतुक कोंडीवर होतोय. खास करुन सकळी आणि संध्याकाळच्या पीक अवर्समध्ये मुंबईकरांना ट्रॅफिकजॅमला सामोरं जावं लागतं. त्यातच अवजड वाहनांमुळं यात भर पडते. म्हणूनच दिवसा अवजड वाहनांना प्रवेश न देण्यासाठीचं नोटीफिकेशन वाहतूक विभागातर्फे काढण्यात आलंय.

या अवजड वाहनांमध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसचाही समावेश आहे. या बसेसला प्रवेश मिळेल, मात्र त्यांना बसेस रस्त्यांवर पार्क करता येणार नाहीत. ज्या ठिकाणी पे अॅन्ड पार्कची व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्याच ठिकाणी या बसेस पार्क करता येतील. तसंच या बसेसना मुंबईत येण्यासाठी काही रस्ते ठरवून देण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 13, 2017 10:28 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...