राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीचा निर्णय नाही

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीचा निर्णय नाही

कर्जमाफीच्या मुद्यावरून आज भाजप आणि शिवसेनेने वेगळी चूल मांडल्याचं दिसून आलं.

  • Share this:

07 जून : शिवेसेनेच्या मंत्र्यांच्या अनुपस्थितीत कॅबिनेट बैठक संपली. आजच्या बैठकीत कर्जमाफीबद्दल कोणताही निर्णय झालेला नाही.त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.तर कर्जमाफीच्या मुद्यावरून आज भाजप आणि शिवसेनेने वेगळी चूल मांडल्याचं दिसून आलं.

त्याआधी शिवसेना मंत्र्यांची सुभाष देसाईंच्या बंगल्यावर बैठक झाली.संपूर्ण कर्जमाफीची मागणी यावेळी यांनी केलीय.तर उद्धव ठाकरेंना माहिती दिल्याशिवाय सरकार कर्जमाफीची घोषणा करू शकत नाही असेही ते त्यावेळी म्हणाले.त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारतही नाहीत का असा प्रश्न उपस्थित होतोय.

तर सेना मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला नसून त्यांनी गैरहजर राहण्याची अनुमती मागितल्याचं  भाजपकडून सांगण्यात येतंय. तर शिवसेना-भाजपमध्ये कुठलाही वाद नसल्याचं सांगत अर्थमंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी भाजप आणि सेनेमधील वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2017 02:32 PM IST

ताज्या बातम्या