मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'7 वर्षात ना केला विकास, मोदींनी केला देश भकास' काँग्रेसकडून बॅनरबाजी

'7 वर्षात ना केला विकास, मोदींनी केला देश भकास' काँग्रेसकडून बॅनरबाजी

मोदी सरकारच्याविरोधात काँग्रेसच्या (Congress) नेत्यांनी हाताला काळ्या फिती बांधून मुंबई (Mumbai) निदर्शनं केली.

मोदी सरकारच्याविरोधात काँग्रेसच्या (Congress) नेत्यांनी हाताला काळ्या फिती बांधून मुंबई (Mumbai) निदर्शनं केली.

मोदी सरकारच्याविरोधात काँग्रेसच्या (Congress) नेत्यांनी हाताला काळ्या फिती बांधून मुंबई (Mumbai) निदर्शनं केली.

मुंबई, 30 मे : मोदी सरकारला (Modi Goverment) सत्तेत येऊन आज 7 वर्ष (7 years of NDA) झाले आहे. मोदी सरकारच्याविरोधात काँग्रेसच्या (Congress) नेत्यांनी हाताला काळ्या फिती बांधून मुंबई (Mumbai) निदर्शनं केली आहे. '7 वर्षात ना केला विकास, मोदींनी केला देश भकास' अशी बॅनरबाजी सुद्धा काँग्रेसने केली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत निदर्शनं करण्यात आली आहे.

'मोदी सरकार हे सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे एकत्र जमलो आहोत, गेल्या सात वर्षात मोदी सरकारने कोणतेही विकासाचे काम केले नाही. कोरोनाच्या काळात ढिसाळ नियोजन केले आहे, अशी टीका यावेळी नाना पटोले (Nana Patole) यांनी केली.

'ते दीड वर्ष नीट झोपू शकलो नाही', रविंद्र जडेजानं सांगितला भीतीदायक अनुभव

तर, सत्तेवर येण्याआदी मोदी सरकारने मोठी आश्वासने दिली होती. 15 लाख रुपये खात्यावर देऊ, काळा पैसा संपवू, महगाई कमी करू अशी अनेक आश्वासने दिली होती. पण, आता पेट्रोल शंभर पार झाले, एलपीजी नऊशेवर गेला. खाद्यतेल 60 रुपये होते ते आता 200 वर गेले आहे, अशी टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

मोदी सरकारमुळे कोरोना वाढवला - थोरात

दरम्यान, 'कामगार कायद्यामध्ये बदल केले, कामगारांपेक्षा मालकांना जास्त विचारात घेतले गेले. दिल्लीत शेतकरी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला गेला, पण याची नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली नाही. कोरोना संकट येणार काळजी घ्या, हे राहुल गांधींनी आधीच सांगितले होते. पण त्यांचे ऐकले नाही आणि कोरोना वाढला. यावर तोडगा काढण्याऐवजी थाळ्या वाजवल्या, दिवे लावले हा उपाय नव्हता. निवडणुकीचे मेळावे, धार्मिक मेळावे भरले यामुळे कोरोना वाढला, असा आरोपही थोरात यांनी केला.

परभणीमध्ये काळे झेंडे दाखवत मोदी सरकारचा निषेध

'देशातील मोदी सरकारला सत्तेमध्ये येऊन सात वर्षे पूर्ण झाली असून, सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप करत राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने काळे झेंडे दाखवत परभणीमध्ये निषेध आंदोलन करण्यात आले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये हे आंदोलन करण्यात आले. देश आर्थिक संकटात असून सर्वसामान्यांचे जिने बेहाल झाले असल्याचा आरोप, यावेळी आंदोलकांनी केला आहे. कोरोना सारख्या महामारीमध्ये, नियोजनात अपयश आल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. तर पेट्रोल व डिझेलची भाववाढ, नोटबंदी , जीएसटी सारखे निर्णय घेतल्याने आज देश संकटात सापडला असल्याचा आरोप करण्यात आला. सोबत जनतेची संपत्ती असलेल्या रेल्वे, विमानतळे, बँका आणि पेट्रोलियम कंपन्या विकायला काढले असून, त्यामुळे देखील देश येणाऱ्या काळात अधिक आर्थिक संकटात सापडणार असल्याचा इशारा यावेळी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आला आहे.

First published:

Tags: PM narendra modi