S M L

नवी मुंबईत आोल्या-सुक्या कचऱ्याची सोबतच वाहतूक आणि डम्पिंग

नवी मुंबई महापालिका देशातील तिसरी स्मार्टसिटी होती. कालांतराने ही स्मार्टसिटी 8 व्या क्रमांकावर आली आहे. स्वच्छ नवी मुंबई नावाने पुरस्कार स्विकारणाऱ्या नवी मुंबई महापालिकेची आता पोलखोल झालीय. 80 टक्के ओला सुका कचऱ्याचं वर्गीकरण केली जाणारी महापालिका म्हणून प्रसिद्ध होती

Chittatosh Khandekar | Updated On: Dec 7, 2017 09:10 AM IST

नवी मुंबईत आोल्या-सुक्या कचऱ्याची सोबतच वाहतूक आणि डम्पिंग

 07 डिसेंबर:  एकेकाळी देशातील तिसऱ्या नंबरची स्मार्टसिटी असलेल्या नवी मुंबई महापालिका क्षेत्रात  ओला सुक्या कचऱ्याचं वर्गीकरण केलंच जात नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

नवी मुंबई महापालिका देशातील तिसरी स्मार्टसिटी होती.  कालांतराने ही स्मार्टसिटी 8 व्या क्रमांकावर आली आहे.  स्वच्छ नवी मुंबई नावाने पुरस्कार स्विकारणाऱ्या नवी मुंबई महापालिकेची आता पोलखोल झालीय. 80 टक्के ओला सुका  कचऱ्याचं वर्गीकरण केली जाणारी महापालिका म्हणून प्रसिद्ध होती. तसं म्हणून स्मार्टसिटीचे गुणही या महापालिकेने मिळवले होते.  ही महापालिका प्रत्यक्षात ओला सुका कचरा कसा एकत्रित वाहतूक करते आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातून जरी काही प्रमाणात ओला सुका कचरा वेगळा केला गेला तरी तो प्रत्यक्षात डम्पिंग ग्राऊंडवर तो एकत्रच केला जातोय. महापालिकेने ओला सुका कचरा वर्गीकरण करण्यासाठी 450 सोसायट्याना नोटिसा बजावल्या आहेत.  मोठ्या सोसायट्यांनी कचऱ्याचे कंपोस्ट करण्याचे बंधनकारक करायला सांगत आहेत. पण प्रत्यक्षात स्वतः महापालिका कायद्याचं किती पालन करते आहे .


महापालिकेचं घनकचरा विभाग बेजबाबदारपणे वागतोय. नवी मुंबईकरांना शिस्तीचे धडे देणाऱ्या या अधिकाऱ्यांवर महापालिका आयुक्त कारवाई करणार का असा सवाल नवी मुंबईकर करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 7, 2017 09:01 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close