Home /News /mumbai /

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नाहीच! मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर काँग्रेस नाराज?

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नाहीच! मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर काँग्रेस नाराज?

अध्यक्षपदाची निवडणूक न घेतल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे.

    मुंबई, 05 जुलै : गेल्या चार महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या पावसाळी अधिवेशनात (monsoon season Maharashtra) रखडला जाणार असल्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (assembly speaker election)  आणि शिवसेना अध्यपदाच्या निवडणुकीसाठी अनुकुल नाही. त्यामुळे विशेष अधिवेशन बोलावून अध्यक्षपदाची निवडणूक केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपद रिक्त झाले होते. मागील अधिवेशन अध्यक्षविनाच पार पडले. त्यानंतर पावसाळी अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी अशी मागणी पुढे आली. परंतु, पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार नाही. हिवाळी अधिवेशन पूर्वी विशेष अधिवेशन घेऊन विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेणार, अशी माहिती सूत्रांनी दिली. 'तू खरंच प्रेम केलं का'? युवकानं GF सोबत केलेलं कृत्य पाहून न्यायाधीशही हैराण अध्यक्षपदाची निवडणूक न घेतल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. मुख्यमंत्री ठाकरे अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायला तयार नाही, अशी माहिती समोर आहे. तसंच,  महाविकास आघाडीचे नऊ आमदार अधिवेशनात गैरहजर आहे, त्यामुळेही हा निर्णय टाळण्यात आला आहे. किती हा दुरावा, मुख्यमंत्री ठाकरे आणि फडणवीस समोरासमोर आले पण...,VIDEO दरम्यान, दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपचे विरोक्षी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यांच्या भेटीनंतर राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षपद भरण्यात यावे, असं पत्र ठाकरे सरकारला पाठवले होते.  पण, राज्यपाल भाजपची मागणी लावून धरत दबाव आणत आहे. त्यामुळे राज्यपालांचा हा निर्णय डावलण्यात यावा, असा निर्णय समन्वय समितीच्या बैठकीत झाला होता.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या