चुकीला माफी नाही! तरुणींची छेडछाड काढणाऱ्याला नितीन नांदगावकरांनी दिला चोप, पाहा VIDEO

चुकीला माफी नाही! तरुणींची छेडछाड काढणाऱ्याला नितीन नांदगावकरांनी दिला चोप, पाहा VIDEO

फेसबुकवर VIDEO शेअर करत नांदगावकरांनी मुलींचे छेडछाड करीत त्यांना चुंबन घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या विकृताला धुतलं, कायदा हातात का घेतला?

  • Share this:

मुंबई, 18 फेब्रुवारी : मुंबईतील माटुंगा रेल्वेस्थानकात एका युवतीचा विनयभंग करून तिच्या गालावर बळजबरी चुंबन घेणाऱ्या आरोपीला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र त्रास दिलेली कोणतीही तरुणी तक्रार करण्यासाठी पुढे न आल्याने त्या आरोपीला सोडून देण्यात आलं होतं. 25 जानेवारी रोजी एक तरुणी पुलाच्या पायऱ्या चढून जात असताना तिचा पाठलाग करीत असलेल्या एका युवकाने जवळ येऊन त्या युवतीला काही कळायच्या अगोदरच तिच्या अंगाला स्पर्श करीत तिच्या गालावर चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार माटुंगा रेल्वे स्थानकावरील सीसीटीत कैद झाला होता.

या आरोपीला शिवसैनिक नितीन नांदगावकर यांनी ताब्यात घेऊन चांगलीच समज दिली आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ त्यांनी आपल्या फेसबुकवर शेअर केला आहे. त्यांनी आरोपीला मारहाण करीत यापुढे कधीच कोणत्याही  महिलांसोबत छेडछाड करणार नसल्याचं वदवून घेतलं आहे. माटुंगा स्टेशनवरील तरुणींसोबत छेडछाड करीत त्यांच्या अंगाला स्पर्श करणारा आणि काही कळायच्या आत त्यांचं चुंबन घेऊऩ पळ काढणाऱ्या या विकृत आरोपीला नितीन यांनी कायदा हातात घेत मारहाण केली आहे. याशिवाय त्यांनी या व्हिडिओमध्ये पोलीस माझ्यावर कारवाई करू शकतात असंही म्हटलं आहे.  हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. काही जणांकडून नितीन यांनी कायदा हातात का घेतला असा प्रश्न विचारला जात आहे. तर दुसरीकडे काहींनी नितीन य़ांनी केलेल्या कामाचे समर्थन केलं आहे. तब्बल 6.15 मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये नितीन यांनी आरोपीला मारहाण केली आहे. यावेळी त्यांच्या शेजारी एक व्यक्ती बसलेला असून त्यांच्या मागे शिवसेना संस्थापक  बाळासाहेब ठाकर यांचे मोठे छायाचित्र आहे. तरुणींची छेडछाड़ करणारा हा आरोपी विवाहीत असून त्याला चार मुलं आहेत. हा आरोपी सोफ्याचं काम करतो. भायखळ्यातील एका कारख्यान्यात तो सोफ्याचं काम करतो. आणि मीरा रोडला राहतो. उजव्या हाताने मुलींना स्पर्श करणाऱ्या आरोपीच्या हातावर नितीन नांदगावकर यांनी पाय ठेवला आहे. शिवसैनिक म्हणून महिलांची सुरक्षा करणं ही आमची जबाबदारी आहे आणि यापुढे मुंबईतील महिलांना अशा प्रकारे हात लावणाऱ्यांचे हात छाटले जातील, असं नितीन यावेळी म्हणाले.

First published: February 18, 2020, 9:50 AM IST
Tags: shivsena

ताज्या बातम्या