...त्यामुळे राज ठाकरेंसारख्या दैवताची साथ सोडावी लागली, नितीन नांदगावकरांचा मोठा खुलासा

नितीन नांदगावकर यांनी पक्ष सोडल्यानंतर सोशल मीडियावर एकच विषय ट्रोल होत होता तो म्हणजे नांदगावकर यांनी मनसे पक्ष का सोडला?

News18 Lokmat | Updated On: Oct 4, 2019 09:50 PM IST

...त्यामुळे राज ठाकरेंसारख्या दैवताची साथ सोडावी लागली, नितीन नांदगावकरांचा मोठा खुलासा

मुंबई, 04 ऑक्टोबर : काही दिवसांपूर्वी मनसेचे डॅशिंग नेते म्हणून ज्यांची ओळख होती ते म्हणजे नितीन नांदगावकर. पण राज ठाकरे यांच्यासोबत निवडणुकीच्या आखाड्यात सोबत राहण्याआधीच त्यांनी साथ सोडली. राज ठाकरेच माझे दैवत आहेत आणि राहतील, असं सांगत मनसे का सोडली, याचा खुलासाचा आता नांदगावकर यांनी केली.

नितीन नांदगावकर यांनी पक्ष सोडल्यानंतर सोशल मीडियावर एकच विषय ट्रोल होत होता तो म्हणजे नितीन नांदगावकर यांनी मनसे पक्ष का सोडला. काय कारण होते? निवडणुकीचे तिकीट न दिल्याने नितीन नांदगावकर यांनी पक्ष सोडला का? या अनेक प्रश्नांची उत्तरे नितीन नांदगावकर यांनी न्यूज १८ लोकमतशी बोलताना दिली.

नांदगावकर म्हणाले, 'राज ठाकरे हे माझ्या दैवत आहेत आणि राहतील. पण त्यांच्या भोवती असलेल्या बडव्यांमुळं मनसे सोडावी लागली.'

विशेष म्हणजे, मनसे निवडणूक लढणार की नाही अशी चर्चा सुरू होती. अखेर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आग्रहानंतर राज यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. अनेक पदाधिकारी आमदारकी लढवण्यासाठी इच्छुक होते. त्यातच एक नाव होतं नितीन नांदगावकर यांचं. परंतु, पहिली यादी जाहीर झाली, दुसरीही यादी जाहीर झाली पण नांदगावकर यांचं नाव काही आलं नाही. त्यामुळे नाराज झालेले नांदगावकर सेनेत दाखल झाले.

'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत नितीन नांदगावकरांनी हाती शिवबंधन बांधून घेतलं.

Loading...

दरबार आणि डॅशिंग नेते!

गेले काही वर्षे नितीन नांदगावकरांनी बेशिस्त ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना बदडून काढत चांगलंच सरळ केलं होतं. त्यामुळे ते प्रवाशांमध्ये चांगलेच लोकप्रिय झाले होते. त्यांचा दरबारही चांगलाच लोकप्रिय आहे. अडल्या नडल्यांसाठी ते नेहमी धावून येतात. एवढंच नाहीतर काही परदेशी नागरिक सुद्धा त्यांच्या दरबारात मदत मागण्यासाठी आले होते. साहजिकच नांदगावकर यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पण, ज्या मनसेचा झेंडा हाती घेऊन नांदगावकर खिंड लढवली. त्यांना विधानसभेचं तिकीटच मिळालं नाही. त्यामुळे नाराज झालेले नांदगावकरांना सेनेची वाट धरावी लागली. 'माझ्या दैवताला बडव्यांनी घेरलं' त्यांच्या या विधानामुळे राज ठाकरे यांच्याभोवत नेमके बडवे कोण आहे, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

मनसेची तिसरी यादी

भांडूप- पश्चिम संदीप जळगांवकर

विक्रोळी- विनोद शिंदे

मुलुंड- हर्षदा राजेश चव्हाण

वडाळा- आनंद प्रभू

उरण- अतुल भगत

पिंपरी- के.के. कांबळे

मिरा-भाईंदर- हरीष सुतार

बार्शी- नागेश चव्हाण

सांगोला- जयवंत बगाडे

कर्जत-जामखेड- समता इंद्रकुमार भिसे

शिरूर - कैलास नरके

आंबेगाव - वैभव बाणखेले

खेड आळंदी - मनोज खराबी

पुणे कँटोन्मेंट - मनिषा सरोदे

उमरगा - जालिंदर कोकणे

ओवळा माजिवडा - संदीप पाचंगे

पालघर - उमेश गोवारी

विक्रमगड - वैशाली सतीश जाधव

बदनापूर - राजेंद्र भोसले

राजापूर - अविनाश सौंदाळकर

दौंड - सचिन कुलथे

पुरंदर - उमेश जगताप

भोर- अनिल मातेरे

चाळीसगांव - राकेश जाधव

वसई - प्रफुल्ल ठाकूर

डहाणू - सुनील इभान

देवळाली - सिद्धांत मंडाले

लातूर ग्रामीण अर्जुन वाघमारे

भंडारा - पूजा ठक्कर

वरोरा - रमेश राजूरकर

भुसावळ - निलेश सुरळकर

==================================================

मनसेची दुसरी यादी

डोंबिवली - मंदार हळबे

धुळे (शहर) - प्राची कुलकर्णी

जळगाव (शहर) - जमील देशपांडे

जळगाव (ग्रामीण) - मुकुंद रोटे

अमळनेर - अंकलेश पाटील

अकोट - रवींद्र फाटे

रिसोड - विजयकुमार उल्लामाळे

कारंजा - सुभाष राठोड

पुसद - अभय गेडाम

नांदेड उत्तर - गंगाधर फुगारे

परभणी - सचिन पाटील

गंगाखेड - विठ्ठल जवादे

परतूर - प्रकाश सोळंखे

वैजापूर - संतोष जाधव

भिवंडी पश्चिम - नागेश मुकादम

भिवंडी पूर्व - मनोज गुडवी

कोपरी-पाचपाखाडी - महेश कदम

ऐरोली - निलेश बाणखेले

अंधेरी पश्चिम - किशोर राणे

चांदिवली- सुमीत भारस्कर

राजूरा - महालिंग कंठाडे

राधानगरी - युवराज येडूरे

अंबरनाथ - सुमेत भंवर

डहाणू - सुनिल निभाड

बोईसर - दिनकर वाढान

शिवडी - संतोष नलावडे

विलेपार्ले - जुईली शेंडे

किनवट - विनोद राठोड

फुलंब्री - अमर देशमुख

उमरखेड- रामराव वानखेडे

घाटकोपर पूर्व - सतीश पवार

अणुशक्तीनगर - विजय रावराणे

मुंबादेवी - केशव मुळे

श्रीवर्धन - संजय गायकवाड

महाड - देवेंद्र गायकवाड

सावंतवाडी - प्रशांत रेडकर

श्रीरामपूर - भाऊसाहेब पगारे

बीड - बैभव काकडे

मोहळ- हनुंत भोसले

उमरेड - मनोज बावनगडे

==================================================

मनसेची पहिली यादी

कल्याण ग्रामीण - प्रमोद राजू रतन पाटील

कल्याण पश्चिम - प्रकाश भोईर

नाशिक पूर्व - अळोक मुर्तडक

माहिम - संदीप देशपांडे

हडपसर - वसंत मोरे

कोथरूड - किशोर शिंदे

नाशिक मध्य - नितीन भोसले

वणी - राजू उंबरकर

ठाणे- अविनाश जाधव

मागाठाणे - नयन कदम

कसबा पेठ - अजय शिंदे

सिंदखेडा - नरेंद्र धर्मा पाटील

नाशिक पश्चिम - दिलीप दातीर

इगतपुरी - योगेश शेवरे

चेंबूर - कर्णबाळा दुनबळे

कलिना - संजय तुर्डे

शिवाजीनगर - सुहास निम्हण

बेलापूर - गजानन काळे

हिंगणघाट - अतुन वंदिले

तुळजापूर - प्रशांत नवगिरे

दहिसर - राजेश येरूणकर

दिंडोशी - अरुण सुर्वे

कांदिवली पूर्व - हेमंत कांबळे

गोरेगाव - विरेंद्र जाधव

वर्सोवा - संदेश देसाई

घाटकोपर पश्चिम - गणेश चुक्कल

वांद्रे पूर्व - अखिल चित्रे

==================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 4, 2019 09:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...