चर्चा तर होणारचं! नितीन गडकरींनी घेतला शिवसेनेच्या माजी मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद
चर्चा तर होणारचं! नितीन गडकरींनी घेतला शिवसेनेच्या माजी मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद
नितीन गडकरींनी राज्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची योजना केली आणि ते वेळेत पूर्णही केले. केवळ भाजपच काय पण इतरही पक्षांमध्ये त्यांच्या कामाचं नेहमी कौतुक होतं.
मुंबई, 7 जानेवारी : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या एका ट्विटची मोठी चर्चा सुरू आहे. नितीन गडकरी यांनी शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा आशीर्वाद घेतल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. आज नितीन गडकरी यांनी मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. गडकरी सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. (Nitin Gadkari took blessings of former Shiv Sena Chief Minister)
गडकरींनी मनोहर जोशींच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली, याशिवाय त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली. गडकरींनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकांऊटवरील काही फोटो शेअर केले आहेत. (Nitin Gadkari took blessings of former Shiv Sena Chief Minister) यामध्ये ते मनोहर जोशींचा आशीर्वाद घेताना दिसत आहेत. नितीन गडकरी आणि मनोहर जोशींच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे.
केंद्रीय मंत्री श्री @nitin_gadkari यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री मनोहर जोशी सरांची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. pic.twitter.com/LzFqht77uZ
हे ही वाचा-ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; मायकेल जॅक्सनच्या कार्यक्रमाचे करमणूक शुल्क माफ
नितीन गडकरींनी ट्विटरवर ही सदिच्छा भेट असल्याचं लिहिलं आहे. मनोहर जोशींच्या कार्यकाळात गडकरी हे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम पाहत होते. 1995 साली राज्यात पहिल्यांदा शिवसेना आणि भाजप यांचं एकत्रित सरकार सत्तेत आलं होतं. 1995 ते 1999 या कार्यकाळात नितीन गडकरींनी अनेक महत्त्वाची कामं पूर्ण केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.