राहुल गांधींना रडू द्या-नितीन गडकरींची टीका

राहुल गांधींना रडू द्या-नितीन गडकरींची टीका

नोटाबंदीमुळे ज्यांचं नुकसान झालं तेच विरोध करत आहेत असा टोला ही गडकरीं यांनी लगावला आहे.यावेळी विरोधकांवर टीका करण्यासोबतच त्यांनी नोटाबंदीचे अनेक फायदेही सांगितले.

  • Share this:

मुंबई, 08 नोव्हेंबर :नोटाबंदीच्या निर्णयावरून  राहुल गांधीं रडत असतील तर त्यांना रडू द्या अशा आशयाची टीका आज केंद्रीय मंत्री  नितीन गडकरींनी राहुल गांधींवर केली आहे.  त्यांची सत्ता गेली म्हणून ते रडत आहेत असंही ते म्हणाले.  नोटाबंदीवर भाष्य करणाऱ्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

नोटाबंदीमुळे ज्यांचं नुकसान झालं तेच विरोध करत आहेत असा टोला ही गडकरीं यांनी लगावला आहे.यावेळी विरोधकांवर टीका करण्यासोबतच त्यांनी  नोटाबंदीचे अनेक  फायदेही सांगितले. नोटाबंदीमुळे भविष्यात अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. 1.38 लाख लोकांनी  तसंच 5 लाख कोटी रूपये जमा केले त्यामुळे देशाचा फायदा होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं . काळा बाजारीची 17.73 लाख प्रकरणं उघडकीस आली आहे ही माहितीही गडकरींनी दिली.म्युचुअल फंडमध्ये ४५ टक्के वाढ झाली आहे.बॅंकांनी कर्जावरचा व्याजदर कमी केला आहे.

याशिवाय नोटाबंदीचे अनेक फायदे येत्या काळात दिसतील असा आशावादही नितीन गडकरींनी व्यक्त केला. तर दुसरीकडे विरोधक देशभर नोटबंदीचा विरोध करत असून आजचा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2017 11:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading