राज ठाकरेंच्या टीकेवर गडकरींनी 'कृष्णकुंज'वर धाडलं पत्र, समोरासमोर चर्चा करण्याचं आव्हान

नितीन गडकरी फुगे उडवण्याचं काम करतात अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला उत्तर देण्यासाठी नितीन गडकरींच्या वतीनं कृष्णकुंजावर थेट लेखी पत्र धाडण्यात आलं आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Mar 24, 2018 09:21 AM IST

राज ठाकरेंच्या टीकेवर गडकरींनी 'कृष्णकुंज'वर धाडलं पत्र, समोरासमोर चर्चा करण्याचं आव्हान

24 मार्च : गुढीपाडव्याला शिवतीर्थावर मनसे मेळाव्यात बोलताना मनसेप्रमुख राज ठाकरेंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर परखड भाषेत टीका केली होती. नितीन गडकरी फुगे उडवण्याचं काम करतात अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला उत्तर देण्यासाठी नितीन गडकरींच्या वतीनं कृष्णकुंजावर थेट लेखी पत्र धाडण्यात आलं आहे. या पत्रात सरकारच्या वतीनं करण्यात आलेल्या कामांची यादी देण्यात आली आहे.

राज्यात केलेल्या रस्ते विकास कामांची ही यादी आहे. सुमारे पाच लाख कोटींची कामे सुरु झाल्याचा दावा गडकरींनी आपल्या पत्रात केला आहे. त्यापैंकी चार लाख २७ कोटींच्या कामांची ही यादी आहे.

राज ठाकरेंकडून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे. मी पाठवलेल्या कामांच्या यादीबद्दल शंका असल्यास शिवाजी पार्कवर जाहीर चर्चा करण्याची आपली तयारी असल्याचं सांगत गडकरींनी आपल्या पत्रात राज ठाकरेंना थेट आव्हान दिलंय. गडकरींचं हे आव्हान राज ठाकरे स्विकारणार का आणि ते यावर काय प्रतिक्रिया देणार यावर सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 24, 2018 09:21 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close