ज्यांच्यात दम असेल ते मोठे होतात, गडकरींचं पवारांना प्रत्युत्तर

ज्यांच्यात दम असेल ते मोठे होतात, गडकरींचं पवारांना प्रत्युत्तर

"वेगळ्या विदर्भाबाबत शरद पवार जे बोलले ते विचारपूर्वक बोलले असतील असं मला वाटतं"

  • Share this:

23 फेब्रुवारी : ज्यांच्यात दम असेल ते मोठे होतात. त्यामुळे दिल्लीत अन्याय होतो या भावनेशी मी सहमत नाही असं प्रत्युउत्तर केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना दिलं.

मुंबईत आज नितीन गडकरींनी पत्रकार परिषद घेतली.  या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्रात 2 लाख 82 हजार 855 कोटींची रस्त्याची कामं सुरू झाली असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली. तसंच मराठी माणूस पुढे येऊ नये म्हणून दिल्लीत प्रयत्न केले जातात अस मत शरद पवारांनी राज ठाकरेंना दिलेल्या मुलाखतीत मांडलं होतं, त्या वक्तव्याचा आज नितीन गडकरींनी समाचार घेतला.

ज्यांच्यामध्ये क्षमता असेल त्याना महत्व मिळते, ज्यांच्यात दम असेल ते मोठे होतात. त्यामुळे दिल्लीत अन्याय होतो या भावनेशी मी सहमत नाही असं नितीन गडकरी म्हणाले.

तसंच वेगळ्या विदर्भाबाबत शरद पवार जे बोलले ते विचारपूर्वक बोलले असतील असं मला वाटतं असं म्हणत त्यांनी पवारांच्या विधानाला पाठिंबा दिला.

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनची गरज आहे. याकडे राजकीयदृष्ट्या पाहू नये, मुंबईला इतर राज्यांना जोडायला गुजरात महत्त्वाचे आहे असंही गडकरी म्हणाले.

तसंच राज्यात 75 हजार कोटींची सिंचन क्षेत्राशी संबंधित कामं सुरू असल्याचंही ते म्हणाले. आत्महत्याग्रस्त आणि दुष्काळग्रस्त भागात 14 हजार कोटींची विविध कामं सुरू आहेत आणि 4 लाख 27 हजार कोटींची राज्यात माझ्या विभागाच्या कामांना गती मिळाल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

नितीन गडकरींच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

- महाराष्ट्रात 2 लाख 82 हजार 855 कोटींची रस्त्याची कामं

- राज्यात 75 हजार कोटींची सींचन क्षेत्राशी संबंधित कामं

- आत्महत्याग्रस्त-दुष्काळग्रस्त भागात 14 हजार कोटींची कामं

- राज्यात सगळी मिळून 4 लाख 27 हजार कोटींच्या कामाला सुरूवात

 - जमीन अधिग्रहणासाठी राज्याला आगाऊ 10 हजार कोटी दिलेत

- राज्यात 167 ब्रिज/बंधारे बांधणार

- 2070 पर्यंत मुंबई पिण्याच्या पाण्याबाबत चिंतामुक्त होईल

- मुंबई आणि आसपासच्या सर्व ठिकाणांना जलवाहतुकीने जोडायचे आहे

- मुंबईच्या नव्या विमानतळाला जलवाहतुकीने जोडणार

- महाराष्ट्र्रात जसे राष्ट्रीय महामार्ग आहेत तसे जलमार्ग निर्माण करण्याचे काम सुरू आहे

- एकूण या सरकारचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत साडे पाच ते 6 लाख कोटीपर्यंत राज्यासाठी खर्च करणार

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 23, 2018 11:13 PM IST

ताज्या बातम्या