नितीन गडकरी आज मुंबई दौऱ्यावर

नितीन गडकरी आज मुंबई दौऱ्यावर

मुंबईत राज्यातील सर्व सिंचन प्रकल्प, त्यांची सद्य परिस्थिती आणि या प्रकल्पांना लागणारा निधी यावर गडकरी बैठक घेणार आहेत

  • Share this:

मुंबई,08 सप्टेंबर: रविवारी नवीन खात्याचा पदभार स्वीकारल्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पहिल्यांदाच महाराष्ट्रात येत आहेत. आता महाराष्ट्रातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती येऊ शकते अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे.

मुंबईत राज्यातील सर्व सिंचन प्रकल्प, त्यांची सद्य परिस्थिती आणि या प्रकल्पांना लागणारा निधी यावर गडकरी बैठक घेणार आहेत.या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन राज्यातले प्रमुख मंत्र्यांच्या उपस्थितीत राहणार आहेत. सह्याद्री अतिथीगृहात आजही बैठक होईल. या बैठकीत जलसंपदा विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी, राज्यातील जलसंपदा आणि प्रकल्पांच्या  संबंधित  विभागांचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 8, 2017 12:07 PM IST

ताज्या बातम्या