मराठी माणसावर हल्ला केल्यास चारही बाजूने खळ्ळखट्याक -नीतेश राणेंचा इशारा

मराठी माणसावर हल्ला केल्यास चारही बाजूने खळ्ळखट्याक -नीतेश राणेंचा इशारा

मराठी माणसाला कुठल्याही अनधिकृत फेरीवाल्यानं मारणं चालणार नाही मग तो कुठल्याही पक्षाचा का असे ना असं ट्विट नीतेश राणेंनी केलं आहे काल फेरीवाल्यांकडून मनसैनिक सुशांत माळवदेला मारहाण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे ट्विट करण्यात आलंय.

  • Share this:

मुंबई,29 ऑक्टोबर: मराठी माणसावर हल्ला केल्यास चारही बाजूने खळखट्याक होईल असा इशारा नीतेश राणेंनी दिला आहे. मराठी माणसाला कुठल्याही अनधिकृत फेरीवाल्यानं मारणं चालणार नाही मग तो कुठल्याही पक्षाचा का असे ना असं ट्विट नीतेश राणेंनी केलं आहे

काल फेरीवाल्यांकडून मनसैनिक सुशांत माळवदेला मारहाण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे ट्विट करण्यात आलंय.

काल काही अनधिकृत फेरीवाल्यांनी सुशांत माळवदे यांना बेदम मारहाण केली होती. त्यांना ऑस्कर रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. दरम्यान, काँग्रेस आमदार नितेश राणेंनीही आज मनसेचे जखमी विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर त्यांनी हे ट्विट करून या मारहाणीचा निषेध केलाय. दरम्यान माळवदेंची राज ठाकरेंनी ऑस्कर रुग्णालयात भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं. त्यामुळे या सगळ्या प्रकरणावर राज ठाकरेंची काय भूमिका आहे, ते अजून कळणं बाकी आहे.

First published: October 29, 2017, 5:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading