Home /News /mumbai /

"पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा, याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर..." नितेश राणेंचं ओपन चॅलेंज

"पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा, याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर..." नितेश राणेंचं ओपन चॅलेंज

"पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा, याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर..." नितेश राणेंचं ओपन चॅलेंज

"पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा, याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर..." नितेश राणेंचं ओपन चॅलेंज

Nitesh Rane: आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन ओवैसींना खुलं आव्हान दिलं आहे.

  मुंबई, 13 मे : एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) हे औरंगाबादमध्ये गुरुवारी आले. यावेळी ओवैसी यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला असून शिवसेना, भाजप, मनसेने जोरदार टीका केली आहे. ओवैसींवर टीकेचा भडीमार होत असतानाच भाजपचे आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी थेट ओवैसींना खुले आव्हान दिलं आहे. आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं, "या कारट्या ओवेसी ला माहीत आहे की, मी औरंगजेबाच्या थडग्या समोर नाचलो तरी मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल.. कारण राज्यामध्ये "नामर्दांचे सरकार आहे" याला म्हणतात यांचे खरे हिंदुत्व!!" नितेश राणे यांनी आपल्या पुढच्या ट्विटमध्ये म्हटलं, "मी आव्हान करतो, पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा.. याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर.. आम्ही शिवरायांचे मावळे नाही!!!" पोलिसांना बाजूला करा म्हणत नितेश राणे यांनी थेट आव्हानच दिलं आहे. इतकेच नाही तर नितेश राणे यांनी म्हटलं, ठाकरे सरकारला हनुमान चालीसा बोललेलं चालत नाही. देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले जातात. आता ओवैसींनी केलेल्या कृत्याला 24 तास उलटल्यानंतरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल का नाही केला? असा सवाल उपस्थित केला आहे. "...तुम्हालाही त्याच मातीत गाडणार" : संजय राऊत शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तर थेट ओवैसींना इशाराच दिला आहे. तुम्हालाही त्याच कबरीत गाडणार असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे. संजय राऊत म्हणाले, औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन हा रितीरिवाज असू शकत नाही. संभाजीनगरला वारंवार यायचं आणि औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकायचे. यातून जर महाराष्ट्रात अशांतता निर्माण करायची असं काही तरी राजकारण ओवैसींचं दिसत आहे. मी इतकंच सांगेन की, त्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या मातीत मराठ्यांनी बांधली. त्याला कबरीत आम्ही टाकलं. महाराष्ट्रावर चाल करणारा हा मुघल राजा. तुम्ही आज कबरीवर येऊन नमाज पडत आहात... कधीतरी तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल. औरंगजेब हा महान संत नव्हता तो एक आक्रमक होता. महाराष्ट्रावर त्याने आक्रमण केलं. महाराष्ट्रातील मंदिरे, प्रार्थनास्थळे त्याने उद्वस्त केली. आता महाराष्ट्रात येऊन त्याच औरंगजेबाच्या कबरीवर येऊन नमाज पडायचं... हे महाराष्ट्राला चॅलेंज देण्यासारखं आहे. ठिक आहे आम्ही चॅलेंज स्वीकारलं. औरंगजेबाला याच मातीत आम्ही गाडलं होतं. औरंगजेबाचे भक्त आहेत जे राजकारण करत आहेत त्याचीही तिच अवस्था होईल असंही संजय राऊत यांनी म्हटलं.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Sunil Desale
  First published:

  Tags: Asaduddin owaisi, Aurangabad, BJP, Nitesh rane

  पुढील बातम्या