News18 Lokmat

महादेव जानकर–नितेश राणे भेट रद्द होण्याचं कारण काय?

नितेश राणे - महादेव जानकर भेट रद्द झाली आहे. चुकीचा मेसेज गेल्यानं भेट रद्द करण्यात आली.

News18 Lokmat | Updated On: Mar 14, 2019 12:41 PM IST

महादेव जानकर–नितेश राणे भेट रद्द होण्याचं कारण काय?

मुंबई, 14 मार्च : काँग्रेस आमदार नितेश राणे आणि रासपचे अध्यक्ष आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांची आजची भेट रद्द झाली आहे. राणे – जानकर भेट ही चौथ्या आघाडीबाबत नाही तर सिंधुदुर्गात जानकर उमेदवार देणार होते यावर चर्चा करण्यासाठी होती अशी माहिती आता समोर येत आहे. पण, भेटीची बातमी लिक करून चुकीचा मेसेज गेल्यानं नितेश राणे यांनी भेट रद्द केली.

एनडीएमधील घटकपक्ष नाराज असून त्यांनी आता लोकसभेच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष देखील लोकसभा निवडणुकीच्या रणात उतरणार आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मित्र पक्षांची नाराजी आता भाजप दूर करणार का? मित्र पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार का? हे पाहावं लागणार आहे.


'भारिप बहुजन महासंघ निवडणुकीनंतर वंचित आघाडीत विलीन होणार'


Loading...

राजू शेट्टींची आघाडीशी हातमिळवणी

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एनडीएचा मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आता भाजप – शिवसेनेची साथ सोडून आघाडीशी मैत्री करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना – भाजप युती झाल्यानंतर मित्र पक्षांची दखल न घेतल्यानं मित्र पक्षांमधील नाराजी दिसून आली. दरम्यान, राजू शेट्टी यांनी आता आघाडीशी जवळीक केली असून आज जागा वाटपावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. जागावाटपासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीनं काँग्रेसचे नेते अहमद पटेल आणि राजू शेट्टी यांची फोनवरून चर्चा झाली. यावेळी काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेला वर्धा किंवा सांगलीची जागा देण्याची शक्यता आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून हातकणंगले येथे राजू शेट्टी तर काँग्रेसकडून आणखी एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


भाजपमध्ये अनेकांचे पत्ते कट, संधी मिळणारे 'ते' नवीन चेहरे कोण?


शिवसेना – भाजप युती

शिवसेना - भाजप या दोघांमध्ये अखेर दिलजमाई झाली असून भाजप 25 तर शिवसेना 23 जागा लढवणार आहे. विधानसभेसाठी देखील मित्रपक्षांना जागा देऊन उर्वरित जागांवर 50 – 50 असा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. पण, लोकसभेमध्ये मित्र पक्षांना डावललं गेल्याची भावना असून त्यांनी त्याबाबत आता नाराजी देखील व्यक्त केली आहे. रिपाईंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील आपली नाराजी बोलून दाखवली असून त्यांनी दक्षिण मुंबईचा मतदारसंघ देण्यात यावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, सात टप्प्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार असून 23 मे रोजी निवडणुकांचे निर्णय लागतील.


VIDEO: विखे पाटलांच्या भूमिकेवर अशोक चव्हाण म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2019 12:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...